मोटेगाव परिसरात मोटरपंप चोरणारी टोळी सक्रीय

ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव
मोटेगाव परिसरात मोटरपंप चोरणारी टोळी सक्रीय झाली आहे. मोटेगाव येथील शेतकरी श्री जयद्रथ खोब्रागडे यांचे उपरपेठ शिवारात शेत आहे, धान पिकाला पाणी देण्यासाठी शेताला लागून असलेल्या नाल्यावर त्यांचे पाणबुडी मोटार पंप होते अज्ञात चोरट्यांनी दिनांक १२-१०-२०२१ च्या रात्री मोटार पंप लंपास केले आज सकाळी शेत मालक श्री जयद्रथ खोब्रागडे हे धान पिकाला पाणी करण्याकरीता शेतावर गेले असता त्यांच्या शेतावरील मोटार चोरी झाल्याचे निदर्शनास आले , चोरट्यांनी शेतात पाईप व वायर कापून मोटार पंप लंपास केल्यामुळे जयद्रथ खोब्रागडे यांनी पोलीस चौकी नेरी येथे मोटरपंप चोरीची तक्रार दिली असुन अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास नेरी पोलीस चौकी चे पिएसआय मंगेश मोहोड करीत आहेत. मोटर पंप चोरी गेल्याने जयद्रथ खोब्रागडे यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.