N A झालेल्या लेआऊट वर धानाची शेती
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
चिमूर तालुक्याची वाटचाल जिल्हा निर्मिती कडे होत असल्याने दिवसेंदिवस या चिमूर तालुक्यात गर्भश्रीमंत असणारे लोक जमीन घेणे व विकणे या व्यवसायाकडे वढत आहे दिवसेंदिवस या गोरगरिब शेतकऱ्यांच्या शेतजमीन च्या फसवणूकीचे प्रकरण नेहमीच चर्चे मध्ये येत असतात तरी या लेआऊट मालकांना राजकीय पक्षाचे पाठबड असल्याने त्याची कोणतेही प्रकरण उघडीस येत नाही ही दुर्देव आहे ज्या शेतजमिनीचे
शासकीय नियमानुसार कृषक जमिनीचे रूपांतरण अकृषक केल्यानंतर त्या जागेवर कोणत्याही प्रकारचा वापर करता येत नाही परंतु या जागेवर गेल्या २ वर्षा पासून त्या सतत लेआऊट जमिनीवर धानाची शेती होत आहे .
शासकिय नियमाचे तीन तेरा करून समधीत विभागीय अधिकाऱ्यां बरोबर लेआऊट मालकाचे मधुर समंध असल्याने या लेआऊट मालकाच्या विरोधात कोणी तक्रार केली तरी हे अधिकारी त्याच्या पाठपुरावा वरीष्ठ अधिकाऱ्या कडे करत नाही म्हणून चिमूर तालुक्यात एक तरी नवीन प्रकरणाची चर्चा होताना दिसत असते हे प्रकरण तर जून आहे व गेल्या दोन वर्षा पासून सतत त्या N A झालेल्या जागेवर खुलेआम धानाची शेती करत असल्याने आज पर्यंत कोणी या प्रकरणी तक्रार केली नाही हे एक विशेष आहे.
मौजा गडपीपरी तालुका चिमूर येथील सर्वे न १ मधील प्लांट न.१/१ ते १/१३ आराजी हेक्टर असून ही शेतजमीन मंगेश प्रल्हाद नदनवार , रवींद्र प्रल्हाद नदनवार याच्या मालकीची असून तो लेआऊट हा खरकाडा या गावाला व चिमूर कांपा या मेन रोड ला लागून आहे.
तहसीलदार चिमूर यांचे आदेश रा.मा क्र. ०६/ एन.ए.पी.३४/ २०१८ – १९ दिनांक १२/१२/२०१८ नुसार निवास प्रयोजनार्भ अकृषक( N A ) ची परमिशन दिनांक २३/१२/२०१८ (३२९) या तारखेला देण्यात आली असून व त्या लेआऊट मधील काही प्लांट विकले पण आहे अशी चर्चा आहे त्या जागेची कोणतेही प्रकारचीं मोजमाप न करता त्या जागेवर NA ची परमिशन मिळण्याच्या आधी पासून त्या जागेवर ५ वर्षा पासून ही जागा खरकाडा येथील व्यक्ती ठेक्याने करत आहे व गेल्या २ वर्षांपासून त्या जागेला NA ची परमिशन मिळाली असून सुद्धा त्या जागेवर धानाची शेती करण्यात येत असून आज ही त्या जागेवर धानाची पूजंने व पारिला असलेल्या तुरी उभ्या असल्याचे चित्र पाहायला मिळतील या लेआऊट च्या तक्रारी झाल्यावर त्या जागेवर एक दोन दिवसात त्या जागेला J C P च्या माध्यमातून लेवलीग करून त्या ठिकाणी लेआऊट पाडण्यात येऊ शकते कारण या लेआऊट मालक व समधीत अधिकारी यांची साठगाठ असल्याने या प्रकरणाची योग्य प्रकारे चौकशी होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चिमूर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नी या प्रकारच्या N A झालेल्या लेआऊट वर धानाची शेती होत असल्याने त्या जागेची N A ची परमिशन काढन्यात यावी व दोषींवर वर कठोर कारवाही करन्यात यावी अशी निवेदन उपविभागीय अधिकारी चिमूर यांना देण्यात आले असुन निवेदन देत असताना रा.का जिल्हा उपाध्यक्ष राजू मुरकुटे, रमेश खैरै जिल्हा महासचिव, अल्पसंख्याक अध्यक्ष जावेद पठाण, ओबीसी सेल अध्यक्ष जयंता कामडी, युवा तालुका अध्यक्ष अजय चौधरी उपस्थित होते