ताज्या घडामोडी

आम आदमी पार्टी कडुन ग्राम पंचायत निवडणूक जिंकून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन

मुख्य संपादकः कु. समिधा भैसारे

आम आदमी पार्टी महाराष्ट्राच्या संघटनात्मक बांधणीला मजबूत करण्याच्या हेतूने तसेच ग्राम पंचायत पातळीवर निवडणूक जिंकून आलेल्या सदस्यांचे अभिनंदन करण्याच्या उद्देशाने आम आदमी पक्षाचे राज्य सचिव श्री धनंजय शिंदे मुंबई तसेच आप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष श्री किशोरजी मंध्यान मुंबई यांचा 13 फेब्रुवारी 2021 पासून महाराष्ट्र दौरा चालू असतांनाच दिनांक 16 फेब्रुवारी 2021 ला चंद्रपुर जिल्हा दौऱ्याचा योग्य आला. म्हणून या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा महानगर क्षेत्रातील झोन क्रमांक 2.चंद्रपुर. येथील पक्षाचे जिल्हा महानगरचे संघटनमंत्री श्री सुनील रत्नाकर भोयर यांचे जनसंपर्क कार्यालय,℅सुनील रत्नाकर भोयर, विठ्ठल मंदिर समोर,विठ्ठल मंदिर वॉर्ड क्रमांक १.चे उदघाटन पक्षाचे राज्य सचिव श्री धनंजय शिंदे मुंबई तसेच पक्षाचे उपाध्यक्ष श्री किशोरजी मंध्यान;मुंबई या दोघांच्याही हस्ते रोज बुधवार ला दिनांक 17 फेब्रुवारी 2021 ला उद्घघाटन करण्यात आले.
त्या प्रसंगी पक्षाचे महानगर जिल्हा संयोजक श्री प्रशांत येरने; संघटनमंत्री सुनील रत्नाकर भोयर; सहसंयोजक श्री योगेश आपटे जिल्हा ग्रामीणचे संयोजक श्री सुनील मुसळे, सचिव श्री संतोष दोरखंडे;कोषाध्यक्ष श्री भिवराज सोनी; महानगर सहसचिव श्री अजय डुकरे ;सहसंयोजक श्री सिकंदर सागोरे ; सहसंयोजक श्री बबन कृष्णपल्लीवार; कोषाध्यक्ष श्री अशोक आनंदे;कार्यकर्ते श्री पोटेजी,श्री दिलीप तेलंग, भद्रावती तालुका अध्यक्ष श्री सोनल पाटील विठ्ठल मंदिर वॉर्ड मधील झोन 2 चे अध्यक्ष संदीप तुरक्याल तसेच सचिव वॉर्डातील नागरिक श्री दत्तात्रय महादूरकर,श्री वैभव देसाई,श्री अशोक अहिरकर जी आणि असंख्य युवक कार्यकर्ते उपस्थित होते. असे पक्षाचे जिल्हा मीडिया संयोजक श्री राजेश चेडगूलवार यांनी कळविले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close