पोहरा येथील ७७ वर्षीय शहारे यांचा राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी झाल्या बद्दल गावकऱ्यांनी धुमधडाक्यात केला सत्कार

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी
लाखनी तालुक्यातील पोहरा यातील 77 वर्षीय सुदाम शहारे हे गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत विजयी झाले आहेत.यामुळे त्यांची निवड स्पेनमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी झाली आहे.पोहरा येथील सुदाम शहारे यांनी गोवा येथील आयोजित स्पर्धेत असोसिएशन मार्फत स्पर्धेत 75 वर्षावरील वयोगटात एकेरी विजेतेपदाला गवसणी घातली आणि अंतिम सामन्यात त्यांनी यजमान गोव्याचे सतीश कुडचडकर यांच्या 21-13,25-23 असा पराभव केला व उपांत्य फेरीत त्यांनी चौथे मानांकित गुजरातचे अल्फ्रेड ख्रिस्तियानला हरविले यामुळे त्यांची नोव्हेंबर महिन्यात स्पेन येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.तालुक्यातील पोहरा येथील सुदाम शहारे हे स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच पोहरा येथील सरपंच रामलाल पाटणकर व भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री इं.मंगेश मेश्राम यांच्या पुढाकारातून गोव्याची तयारी केली आणि आज दिनांक 23 सप्टेंबर 2021 ला सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान सुदाम शहारे हे गावी परतल्या नंतर भव्य जल्लोषात गावकऱ्यांच्या वतीने धूमधडाक्यात स्वगावी पोहरा येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गावातील सरपंच रामलाल पाटनकर,
मा.सुनिल गिर्हेपुंजे माजी तालुका अध्यक्ष लाखनी तालुका काँग्रेस, योगेश गायधने भंडारा जिल्हा काँग्रेस सोशल मिडिया,अभिजित फटे अध्यक्ष पोहरा युवक काँग्रेस गावकरी व इतर पुढारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.