ताज्या घडामोडी

राज राजेश्वर आयुर्वेदिक जडी बुटी औषदीं केंद्राचं उद्घाटन

आधुनिक युगातही आयु्वेदाचे महत्व अबाधित,,

  • पोलीस उपनिरिक्षक अलीम शेख यांचे वक्तव्य

उपसंपादक:विशाल इन्दोरकर

आयुर्वेद ही चिकित्सा पद्धति प्राचीन काळापासून देशात अस्तित्वात आहे, विधनान आणि तंत्रजञानाच्या युगातही आयुर्वेदाचे महत्व कमी झाले नाही. त्यामुळे आजही अनेक आजारांवर आयुर्वेदिक उपचार फायदेशीर ठरले आहेत, असे प्रतिादन उपपोलीस निरीक्षक अलीम शेख यांनी राज राजेश्वर आयुर्वेदिक जाडी बुटी औषधी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी केले आहे. यावेळी प्रमुख अतिथी शिवसेना तालुकप्रमुख श्रीहरी सातपुते, उपस्थित होते.
चिमूर शहरात पहिल्यांदाच सुरू झालेल्या राजराजेश्र्वर आयुर्वेदिक केंद्राचे उद्घाटन पोलीस उप निरीक्षक अलीम शेख यांचे हस्ते शिवसेना तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, यावेळी वैधराज सोमजी नामे, वैद्यराज सुरेश तेलमासरे, निवासी उपतालुका प्रमुख सुधाकर निवटे, युवा सेना तालुका प्रमुख शार्दुल पचारे उपस्थित होते, आयुर्वेदिक केंद्राचे उद्घाटन फित कापून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले,
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैधराज गुरुदास गंधम, राकेश माने, रोहन नन्नावरे, भालचंद्र गायकवाड, अजय सरमुरे, राहुल कोड गंटीवार, कावरे सर यांनी परिश्रम घेतले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close