ताज्या घडामोडी

नेरीत वादळाने ९२ चिमण्यांचा मृत्यू

पर्यावरण संवर्धन समिती नेरीच्या सतर्कतेने काही चिमण्यांना वाचविण्यात यश

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे

चिमुर तालुक्यातील नेरीला सोमवारच्या रात्रो मेघ गर्जनेसह जोरदार वादळाचा तडाखा दिला. विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी सुद्धा पडल्या. चिमुर तालुक्यात वादळाच्या तडाख्यात नेरी येथील ९२चिमण्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारला रा़त्रो घडली.

चिमुर तालुक्यात नेरी येथील छगन सिंह घोंड या व्यक्तिच्या घरच्या लिंबाचा झाडावर शेकडो चिमण्या नेहमीच रात्रो विसावा घ्यायच्या. सोमवार ला अचानक रात्रो वादळ आल्याने निष्पाप चिमण्यांचा बळी गेला. या वादळात ९२ निष्पाप चिमण्यांचा जिव गेला तर पर्यावरण संवर्धन समितीच्या सतर्कतेने काही चिमण्यांना वाचविण्यात यश आले.पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडू लोहकरे यांचे मार्गदर्शनाखाली पर्यावरण संवर्धन समिती सचिव सुशांत इंदोरकर, सदस्य सुदर्शन बावने , राहुल गहुकर, मयुर कुंदोजवार यांनी काही चिमण्या मृत्यू च्या दाडेतुन काढल्या. यामुळे पर्यावरण संवर्धन समिती सदस्यांचे कौतुक केल्या जात आहे.


“”आता सध्या पावसाळा सुरु झाला आहे. वादळासह पाऊस पडत आहे. वादळामुळे जर कुठे पक्ष्यांचा मृत्यू होतांना दिसत असेल तर पक्ष्यांना वाचवा. कुठे पक्षी तडफडत असेल तर वाचवा.पक्षी हा पर्यावरणाचा मौल्यवान घटक आहे. “”

कवडू लोहकरे
पक्षी प्रेमी नेरी

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close