ताज्या घडामोडी
अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर तहसीलदार श्री हांदेश्वर यांची धडक कारवाही

गुंज येथे अवैध रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार पाथरी व त्यांच्या पथकाची धडक कारवाई

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
करत, नदीपात्रा मध्ये अवैध उत्खनन करत असलेले वाहन जप्त करून तहसील कार्यालयामध्ये लावले आहे.
महसूल यंत्रणा निवडणुकीमध्ये व्यस्त असल्याचा फायदा घेत अवैध रेती माफियानी दिवसा नदी पात्रांमधून रेती चोरीसाठी वाहने नदी पात्रामध्ये घातली. याची खबर मिळाल्यावरुन श्री हांदेश्वर, तहसीलदार पाथरी यांनी आपल्या पथकासह मोटारसायकल वरून गुंज नदी पात्राकडे धाव घेतली. वाहन पळवून नेण्याच्या सर्व मार्गावरून पथकाने नदी पात्रामध्ये प्रवेश केल्यामुळे अवैधरित्या वाळू चोरी करणारे वाहन नदी पात्रामध्ये पकडण्यात यश आले.
सदरील वाहन जप्त करून तहसील कार्यालयामध्ये लावण्यात आले आहे.









