सत्कार खर्च टाळून गरजू विद्यार्थिनीस शिक्षणासाठी आर्थिक मदत

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परतूर तालुक्यातील आष्टी पोलिसस्टेशन येथे वार्षिक तपासणी निमित्ताने पोलिस ठाणे हद्दीतील सर्व पोलिस पाटील यांच्या वतीने व DYSP राजू मोरे यांच्या सूचना प्रमाणे सत्कार खर्चा ऐवजी गरीब बिकट परिस्तिथी असणाऱ्या गरजू मुलींचे इयत्ता पाचवी चे शिक्षण साहित्याच्या खर्चा साठी मदत म्हणून दोन हजार रुपये इतकी मदत म्हणून त्वरित जमा करून दिली एक नवीन आदर्श म्हणून सर्व पोलिस पाटील यांचे सर्व स्तरावर कौतुक करण्यात येत आहे यावेळी.बबन सोपान डोळस .बाबासाहेब राधाकीसन लहाडे .बबन संपतराव बान.मधुकर लक्ष्मण वाहुळे.अभिमन्यू यलप्पा जाधव.नारायण रुस्तुमराव बहिरे.प्रमोद विठ्ठलराव सासवडे.आबाजी बळीराम लहाने.गौतम दामोदर पाटील.रामेश्वर ज्ञानोबा आवटे.रामचंद्र बाबासाहेब वाघमारे.नारायण जनार्दन शिंदे.भीमराव गुणाजी मोरे ई.सर्व पोलिस पाटील यांनी योगदान दिले.