वरोऱ्याची लेक अदिती सायरे युक्रेन मधून सुखरूप घरी पोहचली
युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केली मदत
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोऱ्यातील अदिती अनंत सायरे हि युक्रेन मधील युरोप साईडला असलेल्या इवोनो शहरातील फ्रँकक्विक नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटी ला एम बी बी एस च्या द्वितीय वर्षाला शिकत होती.त्या भागात युद्धजन्य परिस्थिती नव्हती .परंतु विद्यार्थ्यानी वेस्टर्न साईडनी जावे अशी सूचना 15 फरवरीला भारतीय दूतावासाने सूचना दिली त्यानंतर थांबायची गरज नसेल तर युक्रेन सोडावं असे सांगण्यात आले.त्यानंतर भारतीय लोकांना आपल्या देशात जाता यावं यासाठी तेथील प्रशासन व एन जी ओ सारख्या संस्थांनी सहकार्य करीत व्हिसा व इतर कागदोपत्री प्रक्रिया पार पाडून 240 भारतीय मुले विमानाने युक्रेन मधील रोमानिया बोर्डरवरून दिल्ली साठी रवाना केले.त्यामध्ये वरोरा येथील अदिती सायरे हिचा समावेश होता.आणि 28 फरवरीला ती वरोऱ्यातील आनंदवन चौकातील आपल्या स्वगृही सुखरूप पोहचली.
युक्रेन आणि रशियाचे युद्ध सुरू झाले.
तेव्हा भारतीय मुलांचे ऑफलाइन क्लासेस सुरू होते.तेव्हा भारतीय दूतावासाने 19 फरवरीला दुसरी सूचना दिली की,युक्रेन लवकरात लवकर सोडावे, तिसरी सूचना 21 फरवरीला देण्यात आली की ,ऑफलाइन चे आणलाइन क्लासेस करण्यात यावे.
अदिती ची भारतात येण्यासाठी 22 फरवरीला तिकीट बुक करण्यात आली.
24फरवरी 2022 ला खारकीय शहरामधील भागामध्ये बॉम्ब हल्ले सुरू झाले अशी माहिती भारतीय मुलांच्या घरी देण्यात आली.युद्ध सुरू झाले आहे.त्यावेळेस आणलाइन क्लासेस सुरू होते.युरोप बाजूच्या बॉर्डर खुल्या होणार होत्या ,यामध्ये रोमानिया,पोलंड,हंगेरीया देशाच्या सीमा खुल्या होणार आहे.आणि तिथून भारतामध्ये परत येण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे असे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले.25 फरवरीला दुपारी निर्णय झाला की आपल्याला भारतात जाण्यास निघायचे आहे आणि 50 मुलांच्या ग्रुप नी एक प्रायव्हेट बस घेतली.आणि त्याचवेळेस वेगवेगळ्या देशाचे लोक बॉर्डर कडे निघाले.
रोमानिया बॉर्डर ला बस जात असताना कीव शहरापासून रोमानिया बॉर्डर 500 की मी अंतरावर होते.6 तासांचा प्रवास केल्यानंतर ट्राफिक खूप जाम होते.त्यामुळे बसमधून उतरून मुलांना रात्रीचे वेळेस दोन तास पायी चालून सीमेवर पोहचले.सीमेवर पोहचल्यानंतर गर्दी खूप होती त्याठिकाणी मुलांना लाईन मध्ये लागावे लागले.व्हिसा तयार व्हायला दोन तासांचा अवधी लागला.हजारो लोक होते.व्हिसा तयार व्हायला चार ते पाच तास लागले.कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रोमानिया बॉर्डर वर परवानगी मिळाली.आणि 26 फरवरीला सकाळी प्रवेश मिळाला.सर्व मुलांना रोमानिया बॉर्डर मध्ये चहा,नास्ता,लंच ची तयारी भारतीय दूतावासाने व एन जी ओ संस्थांनी केली होती.विमानाला वेळ होती म्हणून सर्वांना एका हॉटेल मध्ये शिफ्ट केले होते.विमान कॉन्फर्म झाले तेव्हा 27 फरवरीला पहाटे चार वाजता सर्व विमानतळावर पोहचले.विमानाची 5 वाजताची वेळ होती.युक्रेन च्या स्थानिक वेळेनुसार,सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्यांचे विमान युक्रेनच्या स्थानिक वेळेनुसार 8.30वाजता सकाळी,भारतीय वेळेनुसार 12 वाजता विमानतळावर पोहचले.विमान दिल्ली विमानतळावर 27 फरवरीला सायंकाळी 6 वाजता उतरले.
दिल्ली विमानतळावर प्रत्येक राज्याचे मदत केंद्र होते.दिल्ली ते नागपूर तिकीट काढली होती, परंतु विचारणा करण्यात आली होती की ज्यांना थांबायचे होते त्यांना महाराष्ट्र सदन मध्ये नेण्यात आले.
त्यानंतर मुलांना बसवून दिल्ली विमानतळावरून विमान सोडण्यात आले आणि 28 फरवरीला सकाळी 7 वाजता नागपूर विमानतलावर विमान उतरले आणि अदिती सायरे हि वरोऱ्यात सुखरूप आपल्या घरी पोहचली.