दोन तलावांच्या मध्यभागी असलेल्या पोहे गावाला धोका
सततधार पावसामुळे नाला ओव्हलफ्लो गाव झाला जलमय.
ग्रामीण प्रतिनिधी:देवानंद तुरानकर खेमजई वरोरा
वरोरा तालुक्यातील पोहे गाव हे ६०० लोकसंख्या वस्तीचे गाव असून शेगाव व खेमजई या गावांच्या दोन्ही तलावांच्या मध्यभागी वसलेले गाव आहे.तसेच गावाला लागून एक मोठा नाला असून सततधार पावसामुळे नाला ओव्हरफ्लो झाल्याने गावाला पाण्यानी वेढले असून अक्षरशः दोन घरात पाणी शिरले आहे.
तलाव जर ओव्हरफ्लो झाले तर गाव पूर्णतः जलमय होऊन जीवितहानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
प्रशासनाने पोहे गावाच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सरपंचा माया अरविंदा झाडे यांनी केली आहे.गंभीर समस्यासंदर्भात तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले असल्याचे सरपंचाने सांगितले आहे.
पोहे गावा जवळ मोठा नाला असून त्या नाल्याचे परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या शेत्या असून नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे संपूर्णतः पाणी शेतात साचले आणि जमिनीसुद्धा खरवडून नेल्या त्यामुळे नुकतेच पराठी,सोयाबीन,तुरी चे पीक जमिनीचे वर आले आणि संततधार पावसामुळे होत्याचे नव्हते झाले.शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.तसेच गावातील मुले हि शिक्षणासाठी शेगाव येथे जातात परंतु संततधार पाऊस व आणि पावसाने रस्त्यात पडलेली खड्डे त्यामुळे तीन दिवसांपासून मुलांचे शाळेत जाणे थांबले आहे.पोहे गावात २००५ व २०१० ला गावाला पाण्यानी वेढले होते.
नागरिकांचे जीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
पोहे गावाला परिस्थितीची पाहणी करण्याकरिता तहसीलदार रवाना झाले आहे.परंतु या भागातील आसाला गाव पुलावरून पाणी तसेच बामनडोह पूल खचला असल्यामुळे प्रशासनाला सुद्धा पोहे या गावाला पोहचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली.अखेर तहसीलदार
पोहे गावात पोहचल्या आणि पूर परिस्थितीची पाहणी करून ज्या घरांमध्ये पाणी गेले त्यांना सुरक्षित ठिकाणी आश्रय द्या.तसेच शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामा करून नुकसानभरपाई बाबत कार्यवाही करू,तसेच गावात येणारे पाणी आणि नागरिकांना होणारा त्रास आदि समस्या, गावहिताचे दृष्टीने समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना कळवू असे तहसीलदार रोशन मकवाने यांनी गाव भेटीदरम्यान नागरिकांना सांगितले.