शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी गठित

प्रतिनिधी:हेमंत बोरकर
मौजा अमरपूरी भांसुली येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची (SMC) नवीन कार्यकारिणी नुकतीच गठित करण्यात आली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पालक, शिक्षक व स्थानिक समुदायाचा सहभाग वाढविणे हा समितीचा प्रमुख उद्देश आहे.

यावेळी निवड करण्यात आलेले प्रमोद बोरकर अध्यक्ष, विनोद चौखे उपाध्यक्ष, अनिल भोयर, राजू धोंगडे, वैशाली सातपैसे, शारदा कुमरे, स्नेहा बोरकर, सौ. रणदिवे ताई सदस्य म्हणून निवड करण्यात आली. समितीच्या माध्यमातून शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह विविध शैक्षणिक व विकासात्मक बाबींवर लक्ष देण्यात येणार आहे.
शाळेच्या विकासासाठी पालक व शिक्षकांनी एकत्रितपणे काम करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. नंदनवार सर, श्री. नन्नावरे सर, पोलिस पाटील श्री. धोंगडे, श्री. हेमचंद बोरकर प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. नव्याने गठित झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.









