ताज्या घडामोडी

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बलदेव बावने यांच्या परिवाराला अकरा हजार रुपयांची मदत

रक्तदानासह शिवसेनेचा सामाजिक उपक्रम.

तालुका प्रतिनिधी :ग्यानीवंत गेडाम वरोरा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श समोर करत युवा पिढीचे नेतृत्व करणारे शिवसेना युवा सेनेचे अध्यक्ष व पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले. त्याच अनुषंगाने शिवसेना वरोरा शाखा येथे आज सकाळपासून सामाजिक उपक्रमाची सुरुवात झाली. जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या हस्ते उद्घाटन करून रक्तदान शिबिराची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बलदेव बावणे यांच्या परिवाराला अकरा हजार रुपयाची मदत करण्यात आली.युवा सेनेने घेतलेल्या उपक्रमाला वरोरा येथील मान्यवर मंडळींनी भेट देऊन सामाजिक उपक्रमाकरिता सढळ हाताने मदत करण्याचे आश्वासन दिले. मुकेश जिवतोडे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम जुनी नगरपालिका येथे शिवसेना कार्यालयात घेण्यात आला होता. यावेळी जीवन ज्योती ब्लड बँक नागपूर यांना युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान देऊन मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, उपजिल्हाप्रमुख रमेश मेश्राम, तालुकाप्रमुख मुकेश जीवतोडे, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे, मनीष जेठाणी, दिनेश यादव नगरसेवक, सुषमाताई भोयर नगरसेविका, गणेश जानवे, समीर हक्के, भूषण बुरीले ,संदीप मेश्राम ,बंडू खैरे, अनिल गाडगे, डॉक्टर अमर सिंग, अमजद खान इत्यादी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close