ताज्या घडामोडी

शाळेकरी मुलगा नाल्याच्या प्रवाहामध्ये वाहुन गेल्याने मृत्यु

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

काल रात्री पासुन चिमुर तालुक्यात मुसळधार पाऊस असल्याने नदी ,नाले तुडूंब भरुन वाहत आहेत अशातच आज सकाळी पाऊस कमी झाला त्यामुळे पेठ भान्सुली अमरपुरी येथील एक शाळेकरी मुलगा आपल्या सायकलने सकाळी १० .४५ ला पाणी बघण्यासाठी घरुन निघाला नाल्यावरून पाणी वाहत होते त्याने सायकल नाल्यावरून टाकली असता सायकल स्लिप होऊन तो मुलगा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहुन गेला मुलाचे नाव गणेश विलास नन्नावरे वय १२ वर्ष घटनेची माहीती चिमुर पोलीस स्टेशन ला मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले गाकऱ्याच्या मदतीने मुलाचा शोध घेत असता मुलाचे प्रेत 4: 30 वाजता मिळाले असून त्याचे शव उप जिल्हा रुग्णालय चिमूर येते शविच्छेदनासाठी नेण्यात आले.
अनेक वर्षा पासून गावकरी पुलियाची मागणी करीत असून प्रशासनाने या कडे दुर्लक्ष केले असून गावातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शाळेतील विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षी असाच प्रकार घडला होता तेव्हा 3 लोक वाहून गेले होते त्यांना गावकऱ्यांच्या मदतीने वाचवण्यात यश मिळाले नंतर तिसरा प्रकार न घडावा म्हणुन तरी प्रसासनाने लवकरात लवकर या कडे लक्ष दयावे अशी मागणी गावकरी करीत आहेत
गावा मध्ये शोकाकुल वातावरण झाले आहे .नन्नावरे परिवार व गावकरी दुःखाचे डोंगर कोसळले असून मृताच्या परिवाराला प्रशासनाने आर्थिक मदत करावी अशी मागनी गावकरी करीत आहेत.
मुलाचा शोध लागेपर्यंत
तहसीलदार कोवे साहेब चिमूर चे उप ठाणेदार मंगेश मोहड व प्रमोद गुट्टे उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close