राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात टाटा कॅन्सर केअर प्रोग्राम, चंद्रपूर यांच्या वतीने कॅन्सर विषयक कार्यशाळा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
महारोगी सेवा समिती आनंदवन वरोरा’ व्दारा संचालित आनंद निकेतन महाविद्यालतील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वच्छ भारत, पर्यावरण, मतदान जनजागृती युवा शक्ती शिबिर दिनांक २० मार्च ते २७ मार्च या कालावधीत सोमनाथ,ग्रामपंचायत मारोडा तालुका मूल, जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महारोगी सेवा समिती,वरोरा चे विश्वस्त कौस्तुभ आमटे यांच्या हस्ते झाले. आनंद निकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणाल काळे, यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख उपस्थिती म्हणून महारोगी सेवा समिती वरोरा च्या पल्लवी आमटे, महाविद्यालयाचे प्रमुख पाहुणे म्हणून महारोगी सेवा समिती चे विश्वत अरुण कदम, कार्यक्रम अधिकारी तथा शिबिर प्रमुख डॉ. रंजना लाड, प्रा डॉ नरेंद्र पाटील, शिबीर प्रमुख व कार्यक्रम अधिकारी, ग्रामपंचायत मारोडाचे सरपंच भिकारुजी शेंडे, उपसरपंच अनुप नेरलवार, उद्घाटन संपन्न करुन दिनांक 24 मार्च 2022 रोजी टाटा कॅन्सर केअर प्रोग्रॅम, चंद्रपूर आणि आनंद निकेतन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कर्करोग आणि तंबाखू जनजागृती कार्यक्रम शिबिराचे आयाेजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर टाटा कॅन्सर केअर चे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डाॅ. आशिष बारब्दे. डापीएम, जिल्हा समन्वयक सुरज साळुंखे. डिपीसी, डॉ. वैधही लोखंडे. डेंटिस्ट, आदिती निमसरकार. स्टाँफ नर्स यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ. आशिष बारब्दे यांनी या शिबिराच्या आयोजनाचा हेतू विशद केला. मुख कॅन्सर, स्तन कॅन्सर, गर्भ कॅन्सर यांची विशेष माहिती व संकल्पना समजावून सांगितले तसेच त्यांचे प्रसार व उपाय योजना ही सांगीतले. नंतर सर्व विद्यार्थ्यांना पावर पॉइंट प्रेझेंटेशन च्या माध्यमातून
सूरज साळुंके, डेंटिस्ट डॉ.वैदेही लोखंडे आणि अदिती निमसरकार मुखकर्करोग, स्तन आणि गर्भाशयाचा कर्करोग,त्यांची लक्षणे, या रोगाचा संसर्ग कसा होतो, त्यावरील उपाययोजना यावर विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जिवतोडे, तर आभार प्रदर्शन संकेत कायरकर यांनी केले. या शिबिरामध्ये 100 विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.