ताज्या घडामोडी

भिसी येथे दुग्ध उत्पादन कंपनी च्या कार्यालयाचे उदघाटन

उपसंपादक:विशाल इन्दोरकर

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी ता. चिमूर जि. चंद्रपूर दवारा संचालित गंगातीरी शेतकरी दुग्ध उत्पादन कंपनी भिसी या दुग्ध उत्पादन कंपनी च्या कार्यालया चे उदघाटन दिनांक 23 जुलै 2023 ला भिसी ता. चिमूर जि.चंद्रपूर येथे कार्यालयाचे उदघाटन व प्रोड्यूसर कंपनी ची मासिक सभा संपन्न झाली. तसेच गंगातीरी प्रोड्यूसर कंपनी मार्फत शुद्ध व भेसळमुक्त दुध व जनावरांना पशु खाद्य विक्री केंद्र सुरु करण्यात आले.या कार्यक्रमाला मान. पुरुषोत्तम वाळके अध्यक्ष किसान मित्र ग्रामीण विकास संस्था नेरी ता.चिमूर जी. चंद्रपूर, मान.मनोजजी गेडाम अध्यक्ष गंगातीरी प्रोड्यूसर कंपनी,मा.अविनाश डोये, रितेश बावनकर,गुरुदेव ढोरे सौ.हर्षाली बोरकर, गजानन नन्नावरे,विजय बोरकर,विजय निकुरे,सागर चौधरी, राहुल वाघधरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close