पक्ष्यांची तहाण भागवण्यासाठी पर्यावरण प्रेमी सरसावले

मुख्य संपादक:कु. समिधा भैसारे
पर्यावरण संवर्धन समीती नेरी चा उपक्रम
चिमूर— चंद्रपुर जिल्ह्यात तापमाणाचा पारा ४० अंशावर आला असून उन्हाची झळ माणसाबरोबर पक्ष्यांना सुद्धा बसत आहे.पक्ष्यांचा पाण्याअभावी मृत्यू होत आहे.पाण्यासाठी पक्ष्यांची वनवन सुरू आहे.”आमच्यासाठी कुणी पाणी ठेवणार का”?अशी आर्त हाक पक्ष्यांकडून केली जात आहे.पक्ष्यांचा चिवचिवाट व किलबिलाट ऐकु येत आहे.चिऊताई , खारूताई , पोपटदादा , कावळेदादा , कोकिळा ताई यांची सुद्धा पाणी मिळत नसल्याने होरपळ होत आहे.
पर्यावरण संवर्धन समीती नेरी कडुन नेरी येथे पक्षी घागर घरोघरी लावण्यात आली.यावेळी पर्यावरण संवर्धन समीती अध्यक्ष कवडू लोहकरे, सुशांत इंदोरकर, सुंदर्शन बावणे, मुन्ना शेख, राहुल गहुकर आदी सदस्य उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कवडू लोहकरे यांची प्रतिक्रिया
“” उन्हाची तीव्रता वाढत आहे.पाण्याअभावी पक्ष्याचा मृत्यू होत आहे.पक्ष्यांची संख्या कमी झाल्यास हाणिकारक किटक व कृमी यांचे प्रमाण वाढेल व सरळ शेतीवर विपरित परिणाम होऊन अन्नसाखळी तुटेल . सर्वांनी झाडावर , अंगणात , छतावर पक्षी घागर ठेवावे.जेणेकरून पक्ष्यांची संख्या व अधिवास वाढेल.””
कवडू लोहकरे
अध्यक्ष पर्यावरण संवर्धन समीती नेरी
पक्ष्यांची संख्या कमी होण्याची संभाव्य कारणे
“”१) जंगलात लागणारी आग
२) मोठ्या प्रमाणात वृक्षतोड
३)वायु प्रदुषण
४) मोबाईल टॉवर
५) वातावरण बदल
६) रासायनिक खते
७)पक्ष्यांची शिकार