ताज्या घडामोडी

रमेशगुडम येते नवीन ग्राम पंचायत कार्यालयची लोकार्पण सोहळा संपन्न

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

सिरोंचा तालुक्यातील येणारी रमेशगुडम हा गाव संपूर्ण जंगलाने व्यापलेला आहे, त्या गावात जाण्यास आजही पक्के रस्ते नसल्याचे दिसून येत आहे, त्या गावाचे विकासासाठी अहेरी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकाराने रमेशगुडम या गावात राष्ट्रीय स्वराज्य अभियान अंतर्गत नवीन ग्राम पंचायत बांधकामचे मंजुरी दिली आहे,
त्याची आज बांधकाम पूर्ण झाले असून त्या नवीन ग्राम पंचायतची लोकार्पण सोहळा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा – भाग्यश्री ताई आत्रामयांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रमेशगुडम चे सरपंचा – कौशल्य आत्राम, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी उप सरपंच सरिता कोलूमुला, सदस्य उपस्थित होते,
प्रमुख पाहुणे म्हणून सिरोंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, जिल्हा उपाध्यक्ष – देवा येनगदूला, आणि रमेशगुडम गावकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close