शिवाजी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये विजेत्या विद्यार्थी-शिक्षकांचा सत्कार

मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
शिवाजी पब्लीक स्कूल व
ज्युनिअर कॉलेज, भिसी येथे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य शिरभये सर होते.

प्रमुख पाहुणे म्हणून सचिव प्रा. नितेश सर, डॉ. सुशांत इंदुरकर, प्रा. मस्के सर, प्रा. बोरकर सर, तसेच निमजे सर उपस्थित होते. सर्व अध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या वेळी मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे, संशोधन वृत्तीचे आणि प्रकल्प सादरीकरणातील कौशल्याचे मनःपूर्वक कौतुक केले. विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशामागे शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचेही त्यांनी विशेषतः गौरव केले.
कार्यक्रमात विजेत्या विद्यार्थ्यांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना प्रमाणपत्रे व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या इतिहासातील हा आणखी एक अभिमानाचा क्षण असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.









