ताज्या घडामोडी

नेरी येथील प्रस्तापीत विलगीकरण केन्द्राची उपविभागीय अधिकारी यांच्या कडून पाहणी

शहर प्रतिनिधी : संजय दडमल नेरी

चिमुर तालुक्यातील कोरोना विषानुचा वाढता प्रादुर्भाव पाहता व चिमुर येथील विलगीकरण केन्द्रात कोरोना बाधितांची व्यवस्था करणे शक्य नसल्याने तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या नेरी येथेही वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन नेरी ग्रामपंचायतीचे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात प्रस्तापीत विलगीकरण केन्द्र सुरु करण्याकरीता उपविभागीय अधिकारी प्रकाश सपकाळ तथा तहसीलदार संजय नागटिळक यांनी पाहणी करुण ग्रामपंचायत मध्ये बसुन लाकडाउन च्या अमलबजावनी संबधात निर्देश दिले .
यावेळेस सरपंच रेखा पिसे उपसरंपच चंद्रभान कामडी ग्रा.प. सदस्य संदीप पिसे , पिटुं खारीक , निखिल पिसे व्यापारी युनीयनचे अध्यक्ष सुरेश कामडी यांच्यासह
ग्राम पंचायत कर्मचारी
किशोर कामडी,भीमराव गुरुनुले,हर्षवर्धन डांगे, विपिन गराटे उपस्थित होते. प्रस्तापीत विलगीकरण केन्द्रात कमीतकमी तिस बाधितांची व्यवस्था करण्यात येईल अशी माहीती उपविभागीय अधिकारी प्रकाश सपकाळ यांनी दिली .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close