ताज्या घडामोडी

नेरी परिसरात दिवसाढवळ्या घडतात मोटारसायकल चोरीच्या घटना

नागरिक हैराण, एकाच महिन्यातील दुसरी घटना .

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशा नसल्याने अनेकांना दळणवळणासाठी अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे त्रस्त झालेले लोक कर्ज काढून लाखभर रुपये खर्च करून दुचाकी घेतात. विविध कामासाठी फिरताना दुचाकी रस्त्यालगत उभी करून आपल्या कामासाठी जातात पण आपण पार्क केलेली दुचाकी सुरक्षित राहील की नाही याची फारशी काळजी घेत नसेल तर सावधान ! कारण पार केलेली वाहने नेरी परिसरात चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. नेरी परिसरात चोरीला जाणारी वाहने यांचे गुन्हे उघडकीस येण्यास भरपूर वेळ लागतो त्यामुळे आपल्या वाहनाची काळजी आपण घेण्याची गरज आहे . पार्क केलेली वाहने भर दिवसा चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच घटना दिनांक २५ ऑक्टोबर 2022 ला दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान धनराज गोमाजी सोयाम यांनी आपली स्प्लेंडर प्लस क्रमांक एम एच 40 सीबी 2104 ही जगन्नाथ कॉम्पुटर नेरी येथे पार्क करून आपले काम करण्याकरिता गेला. काम आटोपुन परत येतात त्यांना त्याची गाडी दिसली नाही. त्यांनी इतरत्र शोधाशोध केली परंतु काही उपयोग झाला नाही, अखेर त्यांनी घटनेची माहिती नेरी पोलीस चौकीचे कर्तव्यदक्ष मेजर धनोरे यांना दिली. धानोरे मेजर यांनी कुठलाही वेळ न घालवता घटनास्थळी येऊन परिसरात असलेली सर्व सीसीटीव्ही फुटेज गोळा केले व पुढील तपास सुरू केला. याची माहिती नेरी परिसरात वाऱ्यासारखे पसरली आणि बारा तासाच्या आत मध्ये चोरीला गेलेली दुचाकी मिळवून देण्यास यश मिळविले. चोरट्याने चोरी केलेली दुचाकी बाजार चौकातील ओठ्याजवळ आणून ठेवून पळाला त्यामुळे ती पहाटेला मिळाली. पोलीस विभागांनी आपली तत्परता दाखवून वेळीच कामाला लागल्यामुळे चोरांमध्ये धास्ती तयार होऊन चोर पडून गेले. त्यामुळे गाडी मालक यांनी मेजर धनोरे यांचे आभार मानले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून पोलीस प्रशासनाकडून चौकशी करून चोरी करणारी टोळी शोधून काढून त्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिक मागणी करत आहे नेरी हे गाव वाहन चोरीचे गाव म्हणून ओळख निर्माण होऊ लागली आहे.
अशीच एक घटना दिनांक 15 सप्टेंबर 2022 ला शांती वार्ड नेरी येथील रहिवासी मधुकर कोंडूजी सोनुने यांची मोटरसायकल क्रमांक एम एच 34 ए एस 1698 ही बोळधा येथील शेताजवळील डांबरी रोडवर पार्क करून आपल्या शेतामध्ये कामाला गेला असता चोरट्याने चोरून नेली. नेरी पासून दोन किमी अंतरावर शेतामध्ये जाण्याकरिता गाडीचा वापर शेतकरी मधुकर सोनुने करीत होता कपाशीच्या पिकाला फवारणी करण्याकरिता स्प्लेंडर प्रो कंपनीची काड्या रंगाची गाडी करंजीच्या झाडाखाली उभी करून शेतात कामाकरिता गेला असता अज्ञात चोरट्याने गाडी चोरून नेली. त्याची तक्रार त्यांनी पोलीस स्टेशन चिमूर येथे दिली परंतु अजून पर्यंत गाडीचा कुठलाही स्थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे मेरी परिसरात अशा घन अनेक दुचाकी चोरीच्या घटना घडत असून काही दुचाकीचा अजून शोध लागलेला नाही त्यामुळे नेरी परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे तरी चोरट्याचा शोध लावून ही भीती दूर करावी अशी नेरी परिसरातील जनतेची मागणी आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close