ताज्या घडामोडी

तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर चिंचाळा(शास्त्री) येतील अपत्तीग्रस्ताला मिळाली मदत

शुभम मंडपे यांच्या प्रयत्नाला यश.

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
मो.8975413493

मौजा चिंचाळा (शास्त्री) येथिल दौलतजी गजभिये यांच्या तीन वर्षां अगोदर 2019 मध्ये पावसामुळे अति वृष्टीमुळे घराची भिंत पडून 10 शेळ्या जागीच ठार झाल्या होत्या आज 2019 ला लोटून तीन वर्षे पूर्ण झाले मात्र या घटनेचे आवेदन देऊन सुद्धा या घटनेकडे दुर्लश होत होते व अपत्तीग्रस्त दौलत गजभिये यांची फाईल एका टेबल वरून दुसऱ्या टेबल वर धूळ खात होती आणि दौलतजी गजभिये यांनी प्रशासनाकडून मदत मिळेल याची आशा पण सोडली होती
मात्र समाज कार्यात अग्रेसर असणारे आंबोली ग्राम पंचायतचे सदस्य व वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शुभम भाऊ मंडपे व त्यांचे सहकारी मनोजजी सरदार यांच्या लक्षात हे प्रकरण येता त्यांनी तहसील कार्यालयात धाव घेतली व या प्रकरणाबद्दल प्रशासनाला तोंडी आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र चिमूर चे तहसीलदार प्राजक्ता बुरांडे व नायब तहसीलदार कोवे सर आणि मेहेर बाबूजी यांच्या सहकार्याने या प्रलंबित प्रकरणाचा पाठपुरावा करीत चिमूर तहसीलदार यांच्या आदेशाने दि 1 मे 2022 ला दौलत जी गजभिये यांना पशुधन खरेदीसाठी शासनाकडून मदत मनुन 27000 हजाराचा धनादेश प्राप्त करून दिला
यामुळे मौजा चिंचाळा(शास्री) येथील अपत्तीग्रस्त दौलतजी गजभिये यांना तब्बल तीन वर्षानंतर दिलासा मिळत आहे
यावेळी धनादेश देतांना करतांना चिमूर चे तहसीलदार प्राजक्ता बुरांडे , तसेच नायब तहसिलदार कोवे सर , मेहेर बाबू व आंबोली ग्राम पंचायत सदस्य शुभम भाऊ मंडपे व जेष्ठ समाजसेवक मनोजजी सरदार व आपत्तीग्रस्त दौलतजी गजभिये धनादेश स्वीकारताना उपस्तीत होते.

प्रतिक्रिया : –
2019 मध्ये मध्ये पावसामुळे अतिवृष्टी मुळे घराची भिंत पडून 10 शेळ्या ठार झाल्या होत्या 3 वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित होते मात्र तहसीलदार प्राजक्ता बुरांडे , नायब तहसिलदार कोवे सर व मेहेर बाबू यांच्या सहकार्याने ह्या प्रकणाचा प्रश्न सुटला व चिंचाळा(शास्त्री) येथील अपत्तीग्रस्त दौलत गजभिये ला दिलासा मिळाला आहे
शुभम मंडपे ग्राम पंचायत सदस्य आंबोली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close