सावरगांव ग्राम पंचायत मध्ये रोजगार हमी योजनेत दिरांगाई व भ्रष्ट्राचार
स्थानिक गावकऱ्यांची संवर्ग विकास अधिकाऱ्याकडे तक्रार.
ग्रामीण प्रतिनिधी: रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालुक्यातील सावरगांव ग्राम पंचायतमधे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत भरष्टाचार व कामात दिरांगाई होत असल्याची तक्रार गावातील नागरिकांनी संवर्ग विकास अधिकारी यांना तक्रार अर्जाद्वारे दिली.
गरीबाच्या भल्यासाठी सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेला स्वताच्या भल्यासाठी राबविन्याकरीता काही मजूराना ऐकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी कामे केल्याचे दाखऊन त्यांची मजूरी काढ़ने, शाशनाकडून पैसा वसूल करण्याकरीता बनावट मश्टर तयार करने आणि मंजूर कामावर नसताना मजूरी लावणे, मेजरमेंट नुसार कामे न करने, अश्या विविध प्रकारानी भृष्टाचार करन्यात आला आहे.
सावरगांव ग्राम पंचायत मध्ये कामाची मोजनी झाली असता हपत्याच्या पेमेंट मध्ये तफ़ावत झाली आहे पेमेंट काढ़ताना काही मजूरांचे पेमेंट जास्त तर काही मजूरांचे पैसे कमी काढण्यात आले, बोड़ी खोलिकारणाच्या कामात मश्टर वरील काम अलग व प्रत्यक्षात काम बघितल्यास कामात तफ़ावत दिसून येत आहे, सन 2021-22 मनरेगा अंतर्गत शोषखड्याचे बाँधकाम निकृष्ट दर्जाचे व कामात भ्रष्ट्राचार झाल्याचे दिसून येत आहे. शोषखड्डे तयार करताना वाटेल त्या ठिकाणी शोष खड्डा तयार करने, ड्रम फिट करने व मटेरियल टाकून एक साधा पिवहिसि पाइप जोडून बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रकार सावरगांव ग्राम पंचायत मधे झाले आहे, 70 ते 75 वर्ष वयोगाटातील लेबर चे नावे टाकून यांचे नावावर लेबर स्वरुपात पैश्याची उचल केली आहे, बोड़ी खोलिकरन व शोष खड्याचे संदर्भात कार्यालईन चौकशी अंती शासकीय स्तरावरुन संबंधित जिम्मेदार पदाधीकारी, सचिव, रोजगार सेवक व संबंधित यंत्रणा यांचेवर करण्यात यावी असी मागणी तक्रार अरजाद्वारे संवर्ग विकास अधिकारी यांना तक्रार अर्जे देण्यात आला.
या वेळी ग्राम पंचायत सदस्य सौ, निषा कुमरे, सौ, लता दडमल, तसेच गावातील नागरिक शंकर ताम्बरे, नरेंद्र नवले, विजय मेश्राम, हेमराज झालवड़े, रामकृष्ण झोड़े, पांडुरंग दडमल, पुष्पा झालवड़े, वृंदा जीवतोड़े, शालू पडवे, रोशन मुरकुटे, विनोद भरडे, अरुण नाकाडे, श्रीकांत नाकाडे व अन्य नागरिक उपस्थित होते.