ताज्या घडामोडी

जिल्हापरिषद पंचायत समिती सदस्य असो.महाराष्ट्र च्या वतीने जिल्हाधिकारी चंद्रपुर ला मागण्यांचे निवेदन

तालुका प्रतिनिधी :कु. कत्यानी मुनघाटे नागभीड

ग्रामिण महाराष्ट्राच्या हितासाठी व सदस्यांच्या न्याय्य हक्कासाठी प्रथमच सर्वपक्षीय संघटना कैलास गोरे पाटील यांनी स्थापन केली आहे. या संघटनेच्या वतीने आज संपुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.लवकरच जिल्ह्यातील सर्व जि.प. व पं.स. सदस्यांची याबाबत विस्तृत बैठक प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे.
चंद्रपुर येथे आज जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. जिल्हापरिषद व पंचायत समिती ही शासन निधीची व योजनांची अंमलबजावणी करणारी यंत्रणा आहे. असे असतांना शासनाने अनेक अधिकार कमी करुन विभागीय आयुक्तांकडे व राज्य शासनाकडे वर्ग केल्या गेल्या आहेत. आज दिलेल्या निवेदनामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा मतदार असावा , जि.प.व पं.स. यांचे राजकीय आरक्षण किमान दहा वर्षासाठी कायम असावे , जि.प. व पं. स. मध्ये मनोनित ( को ॲाप ) सदस्यांची नियुक्ती करावी , ७३/७४ वी घटनादुरुस्ती पुर्णपणे राज्यात लागु करावी , पुर्वी प्रमाणे असणारे किमान बदली अधिकार आणि कर्मचारी नियंत्रणासाठी सी.आर. रिपोर्ट ईत्यादी सारखे अधिकार असावे , पंचायत समिती सदस्यांना विधानपरिषदे साठी मतदानाचा अधिकार असावा, जिल्हापरिषद सदस्यांना वीस हजार तर पंचायत समिती सदस्यांना दहा हजार रुपये मानधन असावे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता .
निवेदन देतांना संघटनेचे जिल्हा संयोजक व जि.प.सदस्य संजय गजपुरे , जि.प. उपाध्यक्षा सौ.रेखाताई कारेकर , माजी जि.प.अध्यक्ष व कॅांग्रेस चे गटनेते सतिश वारजुकर , जि.प.बांधकाम व अर्थ सभापती राजुभाऊ गायकवाड , समाजकल्याण सभापती नागराज गेडाम , कृषीव पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे , ब्रम्हपुरी पं.स. सभापती रामलाल दोनाडकर, चिमुर पं.स. सभापती सौ. लताताई पिसे ,गोंडपिपरीचे उपसभापती अरुण कोडापे , जि.प. माजी बांधकाम सभापती संतोष तंगडपल्लीवार , जि.प.सदस्य सर्वश्री रमाकांत लोधे , राहुल संतोषवार , सौ.ममता डुकरे , सौ.स्वाती वडपल्लीवार , गजानन बुटके , सौ.स्मिताताई पारधी , प्रमोद चिमुरकर , सौ.ज्योतीताई वाकडे , प्रविण सुर तसेच पं.स. सदस्य सर्वश्री प्रदिप कामडी , पुंडलिक मत्ते , शांताराम सेलवटकर , सौ.नर्मदा रामटेके , इत्यादी जि .प. व पं.स.सदस्यांची उपस्थिती होती .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close