ताज्या घडामोडी
घरा समोर १६ चक्का ट्रक उभा ठेवून करतो मुजोरी

प्रतिनिधी:राहुल गहुकर
चिमूर शहरातील इंदिरा नगर येथील घटना. चक्क घरा समोर १६ चक्का नंबर एम.एच. ३४ – बि.जी. २३४७ क्रमांकाचा ट्रक एका घरात समोर केला उभा त्यामुळे रहदारीस होतो अडचण. एकदा ट्रक घरा समोर लावला तर दोन ते तीन दिवस उभा करून ठेवतो. त्यामुळे घरा समोरील जागा स्वच्छ करता येत नाही तसेच घरी येणाऱे जाणारे नातेवाईक किंवा इतरांना याचा त्रास सहन करावा लागतो. हा त्रास गेल्या एक महिण्यापासुन सतत होत आहे.

ड्रायव्हर व कन्डाक्टर चिमूर येथील असून यांना वारंवार सुचना दिली परंतु तुला काय करायचे ते कर असे म्हणतात. आम्ही इथेच ठेवू आम्ही रोड टॅक्स देतो आम्ही कुठेही ठेवू शकतो अशा शब्दांत बोलतात व अरेरावी करतात. त्यामुळे याबाबत नगर परिषद चिमूर व पोलीस स्टेशन चिमूर येथे वसंत महादेवराव बावनकर राहणार इंदिरा नगर, चिमूर यांनी तक्रार दिली.