ग्रा. पं. आंबोली नावीन्य उपक्रमाचे केंद्रस्थान
” सहल कार्यालयाची, भेट अधिकाऱ्याची “
प्रतिनिधी:सुनिल गेडाम
चिमूर पं समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रा. पं. आंबोली येथे गेल्या दिड – दोन वर्षांपासून पदवीधर तथा उच्च शिक्षित सरपंच, उपसरपंच व सदस्य निवडून आल्यापासून गावात नवनवीन आणि जगावेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. आपली ग्रा. पं. लोकांभिमुख व बालस्नेही कशी बनेल याचा ते नेहमी प्रयत्न करीत असतात. यातच यावर्षी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होऊनही अधिकाश लोकांना त्यांच्या अधिकारांची माहिती अजूनही अवगत झाली नाही.म्हणून गावातील लोकांना सरकारी कार्यालयाविषयीं तेथील अधिकाऱ्याविषयीची भीती दूर व्हावी, त्यांना त्यांचे अधिकार कळावे, कर्यालयीन कामकाज कसे चालते याविषयींची माहिती व्हावी म्हणून ग्रामपंचायत आंबोलीचे उपसरपंच श्री. वैभवभाऊ ठाकरे यांच्या संकल्पनेतून नुकताच दिनांक 27 सप्टेंबरला एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. तो म्हणजे ” सहल कार्यालयाची, भेट अधिकाऱ्याची ” यामध्ये गावातीलच नऊ युवक – युवतीची एक टीम प्रायोगिक तत्वावर तयार करून चिमूर येथील सर्व सरकारी कार्यालयात नेवून तेथील अधिकाऱ्यांची भेट घालून देण्यात आली.
यावेळी चिमुरचे उपविभागीय अधिकारी मा. श्री. सपकाळ साहेब, गटशिक्षणाधिकारी मा. श्री. नाट साहेब, बालविकास अधिकारी मा. गेडाम साहेब, वनविभागाचे वनाधिकारी मा. औतकर साहेब, उमेदचे खोब्रागडे साहेब यांनी माहिती दिली तर आदिवासी विभागाचे अधिकारी श्री. बावणकर साहेब यांनी स्पर्धा परीक्षांचे पुस्तके भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी ग्रामपंचायत आंबोलीचे सरपंचा सौ. शालिनी दोहतरे, उपसरपंच मा. वैभवभाऊ ठाकरे, ग्रामसेवक मा. श्री. एल. एन. भसारकर साहेब, व गावातील तरुण – तरुणी उपस्थित होते.