ताज्या घडामोडी

ग्रा पं शिरपूर ची ग्रामस्थांच्या आरोग्याकडे स्पष्ट डोळेझाक

उपसंपादकःविशाल इन्दोरकर

शिरपूर ग्रा पं अंतर्गत येणारी शिवनपायली गट ग्रा पं ही ग्रामपंचायत कार्यालयापासून जेमतेम 4 किमी अंतरावर आहे. शिवनपायली गावातील विकास रामदास पोईनकर तसेच किशोर रामदास पोईनकर हे सण २०२१ पासून त्यांच्या घराशेजारून येणाऱ्या सांडपाण्यामुळे होऊ शकणाऱ्या आरोग्याच्या समस्यां सोडवीन्यासाठी ग्रामपंचायत शिरपूरकडे विनवण्या करून करून थकले आहेत.

चिमुर तहसील कार्यालयाला दिलेला अर्ज

यांच्या घराशेजारील गोबर गॅस तसेच इतर पाणी यामुळे एकाचे घराची भिंत कोसळली तसेच हे पाणी यांच्या अंगणातून वाहून जात असल्यामुळे अंगणाला खराब नाल्याचे स्वरूप असल्यासारखे वाटते. घाण वास व अस्वच्छ वाहणारे पाणी यामुळे घर पण राहेनासे झाले आहे. परंतु उपाय नसल्याने तिथे राहणे आम्हास भाग आहे असे फिर्यादीचे म्हणणे आहे. यासंदर्भात आम्ही ग्रामपंचायत शिरपूरला विनंती अर्ज करून आम्ही चुकलो आहोत, ग्रामपंचायत ला आम्ही ग्रामस्थांच्या आरोग्य व सुविधांशी काही लेनदेण नाही असे त्यांचे म्हणणे आहे. विनंती अर्ज करूनही ग्रामपंचायत आमच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहत नाही तर आम्ही काय करावे या विवंचनात हे परिवार अडकले आहे. यावर कोणती शाशकीय संस्था काय निर्णय घेते याकडे जाणकारांचे लक्ष लागून आहे.

ग्रामपंचायत सिरपुर ला देण्यात आलेला अर्ज
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close