वाय. एस. पवार महाविद्यालयाच्या रासेयो शिबिराचे समारोप

प्रतिनिधी : राहुल गहुकर
चिमुर तालुक्यातील नेरी येथुन जवळच असलेल्या खुटाळा या गावांमध्ये वाय.एस.पवार महाविद्यालयाच्या विशेष शिबीराचे प्रारंभ झाले होते . याचे समारोप ०६/०२/२०२३ ला करण्यात आले . समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे सतीशभाऊ वारजुकर माजी जि. प. अध्यक्ष चंद्रपुर , विजय कुमार घरात सिनेट सदस्य गो. वि. गडचिरोली , रोशनभाऊ ढोक माजी उपसभापती प.स. चिमुर , विनोद बारसागडे उपसरपंच खुटाळा , कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रा. प्राचार्य डी. एच. वैद्य होते. कार्यक्रमाचे संचालन दीक्षांत रामटेके सर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गभाने यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व प्रमुख पाहुण्यांनि शिबिरार्थ्याना मार्गदर्शन केले. शिबिरार्थ्यानी आपला अनुभव सांगितला. कार्यक्रमाचा शेवट मा. पराग चवरे च्या आभाराने झाला. सात दिवसीय विशेष शिबीर यशस्वी करण्यात सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामपंचायत खुटाळा चे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी योगदान केले. गावकऱ्यांचे सहकार्य लाभले.