पाथरी येथे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने सामाजीक न्याय मंत्री संजय सिरसाट यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्याय मंत्री संजय सिरसाट हे पाथरी दौर्यावर आले आसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गोरगरीब नागरीकांच्या न्याय हक्काच्या विविध मागण्या संदर्भात मंत्री संजय सिरसाट यांना एक निवेदन देण्यात आहे
सविस्तर वृत्त आसे कि महाराष्ट्र राज्याचे सामाजीक न्याय मंत्री संजय सिरसाट हे दि.२७/०१/२०२५ रोजी पाथरी दौर्यावर आले आसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने युवा जिल्हा महासचिव आवडाजी ढवळे यांनी गोरगरीब नागरीकांच्या न्यास हक्काच्या मागण्या संदर्भात मंत्री संजय सिरसाट यांना एक निवेदन देण्यात आले सदर निवेदना मध्ये आसे नमुद करण्यात आले आहे कि सामाजिक न्याय विभागा अंतर्गत पाथरी येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मुला/मुलींचे वस्ती गृह निर्मान करण्यात यावे जेणे करुन शेकडो मुला/मुलींच्या शिक्षनाचा प्रश्न सुटेल,शासनाने घरकुलासाठी ग्रामिन-शहरी भेदभाव न करता महागाईच्या निर्देशंकानुसार घरकुलासाठी आर्थीक बजेट वाढवण्यात यावेत,पाथरी शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हाॅल चे पुणरनिर्मान करण्यात यावे,पाथरी शहरातील भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा व परिसराचे सुशोभिकरण करण्यात यावे,शासनाने आनेक उध्दोगपती,शेतकरी यांचे कर्ज माफ केले आहेत त्याच प्रमाने सर्व मागास्वर्गीय महामंडळांचे कर्ज माफ करण्यात यावे,पाथरी तहसिल कार्यलयातील संजय गांधी निराधार विभाग शासनाच्या नियमानुसार स्वयंम घोषना प्रमान पत्र न ग्राहाय न धरता तहसीलचे भुमीहीन प्रमान पत्र व उत्पन्न प्रमान पत्राची आट लावत आहेत ती अट रद्द करुन स्वयंम घोषना प्रमान पत्र स्वीकारावेत,लाडकी बहीन योजने प्रमाने संजय गांधी निराधार,श्रावनबाळ योजनेचा लाभ घेण्यासाठी भुमीहीन व उत्पन्नाची अट रद्द करुन संजय गांधी निराधार योजना व श्रावनबाळ योजनेचा लाभ देवुन हजारो निराधार,वृध्द गोरगरीब नागरीकांना न्याय द्यावे
पाथरी येथील ग्रामिन रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर नसल्या मुळे आनेक गरोधर महिला व तसेच पोटाच्या आजाराने पीडीत आसनारे गोरगरीब रुग्णांच्या आडच होत आहे तेव्हा पाथरी ग्रामीन रुग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरु करुन या रुग्णालया मध्येच पोटाच्या शस्त्रकिर्या करण्यासाठी तज्ञ डाॅक्टर ची नियुक्ती करावी,पाथरी ग्रामिन रुग्णालया मध्ये एॅक्सरे मशिन आहे परंतु आजाराचे निदान होण्यासाठी दोन दिवस लागत आहे.निदान झाल्याच्या नंतर खाजगी दवाखाणा किवा परभणी येथे उपचार घेण्यासाठी जावे लागत आहे या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत म्हणुन पाथरी ग्रामिन रुग्णालया मध्ये संबधीत तज्ञ डाॅक्टरची नियुक्ती करुन या ठिकाणी उपचार करण्यात यावेत,ग्रामिन रुग्णालयास अत्यधुनिक प्रयोग शाळा नसल्या मुळे रक्तांचा रिपोट येण्यासाठी उसीर होत आहे याचा फायदा खाजगी प्रयोग शाळा चालक घेवुन रुग्णांची आर्थीक लुट करत आहेत म्हणुन ग्रामीन रुग्णालयातच अधुनीक प्रयोग शाळेची व्यस्ता करण्यात यावी,पाथरी ग्रामिन रुग्णालयात स्वतंत्र महिला व बाल रुग्णालय सुरु करावे वरिल सर्व बाबीकडे मंत्री महोदयांनी गंभिरता पुर्वक लक्ष करुन हजारो गोरगरीब नागरिकांना न्याय द्यावे आसे सदरील निवेदना मध्ये वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा महासचिव आवडाजी ढवळे यांनी आसे नमुद केले आहे.