२६ जानेवारी चा ध्वजारोहन समारंभ ‘विरपत्नी, विरपीता आणि वीरमाता’ यांच्या हस्ते करावा-डॉ जितीन वंजारे
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
26 जानेवारी चा ध्वजारोहण हा सरपंच, उपसरपंच किंवा गावातील जेष्ठ नागरिक यांच्या हस्ते न होता ज्या ज्या घरातील पुरुषाने देशासाठी आपलं सर्वस्व बलिदान केलं आणि देश सेवेसाठी सीमेवर लढताना त्यांची प्राणज्योत मावळली त्यामुळे गावाकडील त्याच्या घरामध्ये असणाऱ्या वीर पत्नीला, वीर पित्याला किंवा वीर मातेला ध्वजारोहणाचा मान सन्मान द्यावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी केले आहे. मंत्री, संत्री, राजकीय नेते किंवा गावातील सरपंच,उपसरपंच,प्रतिष्ठित नागरिक किंवा इतर मोठे अधिकाऱ्यांकडून ध्वजारोहण करून घेण्यापेक्षा ज्या कुटुंबातील लोकांनी छातीवरती दगड ठेवून आपल्या मुलाला देश सेवेसाठी सैनिकी क्षेत्रामध्ये पाठवलं अशा वीरपिता,वीर माता आणि वीरपत्नी ला ध्वजारोहनाचा मानसन्मान दिला पाहिजे. देशाचे संरक्षण करता करता आपल्या घराचे संरक्षण हरवलेल्या वीर जवान यांच्या घरचे अंधकारात जीवन जगत असणाऱ्या वीरपत्नींना ध्वजारोहणाचा मान सन्मान दिला गेला पाहिजे. पाच वर्षासाठी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना इतरत्र मानसन्मान मिळतोच परंतु ज्या देशाचा झेंडा त्या देशातील सैनिकांच्या रक्तावर ताट मानेने उभा असतो परंतु अतिरेक्यांशी दोन हात करताना ज्या ज्या सैनिकांचे प्राण जातात देश सेवेसाठी ज्यांनी ज्यांनी आपले बलिदान दिले आहे त्या सर्व सैनिकांच्या घरचा अंधार दूर झाला पाहिजे त्यांच्या घरी असणाऱ्या वीरपत्नी, विरपिता आणि वीरमाता यांचा आदराने सन्मानपूर्वक मान देऊन गावातील 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला होणारा ध्वजारोहण कार्यक्रम हा वीर माता,वीरपिता आणि वीर पत्नी यांच्यात शुभहस्ते झाला गेला पाहिजे ही संस्कृती संपूर्ण देशामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये राबवली गेली पाहिजे. जसं की जपान,रशिया आणि कोरिया सारख्या देशांमध्ये प्रत्येक स्त्री पुरुष आर्मी मध्ये आपल्या आयुष्यातील काही वर्ष अर्पण करतो,आर्मीमध्ये भरती होतो आणि देश सेवा करतो त्यांच्यामध्ये देशसेवेचं सर्वोत्तम कार्य करण्याची उमेद असते.त्या देशातील सैनिक जर कुठे दिसला तर त्याला सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते बसमध्ये एखादा सैनिक चढला असता जर जागा नसेल तर राष्ट्रीय नैतिकता म्हणून तेथील नागरिक स्वतः उठतात आणि सैनिकाला बस मध्ये, रेल्वे मध्ये विमानामध्ये पाहिजे तिथे त्याची सीट रिझर्व केली जाते. त्याला सन्मानपूर्वक आदराने बसण्यासाठी जागा दिली जाते कारण त्यांच्याच जीवावरती, ते जागे असतात म्हणून सगळा देश शांत झोपलेला असतो, त्यामुळे देशाचं संरक्षण करणाऱ्या जवानांना मानसन्मानपूर्वक आदराने वागविले जाते. देशातील सर्वोच्च बलिदान समजल्या जाणाऱ्या देश सेवा करणाऱ्या सैनिकांच्या बलिदानाला कायम स्मरणात ठेवून आणि आपल्याला खाण्यासाठी अन्न देणाऱ्या शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कष्टाला सलाम करून प्रत्येक भारतीयाने आपला स्वतःचा दिवस चालू केला पाहिजे.दिवसाची सुरुवात सैनिकांचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानून त्यांना वंदन करून चालू केला पाहिजे कारण या देशातील सर्व लोक सुरक्षित आणि सुपोषित फक्त आणि फक्त सैनिक आणि शेतकऱ्यांमुळेच आहेत,त्यामुळे ‘ जय जवान जय किसान ‘ या युक्तीप्रमाणे आपण जवानाला आणि शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याला मानलं पाहिजे,मान सन्मानपूर्वक त्यांना वागणूक दिली पाहिजे. ज्या ज्या गावातील सैनिकाचे बलिदान झालेल्या वीर माता, वीरपिता आणि वीर पत्नी आहेत त्यांना ध्वजारोहणाच्या दोन ते तीन दिवस अगोदर ग्रामपंचायत द्वारे पत्र पाठवून किंवा निरोप पाठवून ध्वजारोहणासाठी त्यांना 26 जानेवारी व 15 ऑगस्ट या राष्ट्रीय सना दिवशी बोलावलं गेलं पाहिजे आणि त्यांच्याच हातून राष्ट्रध्वजारोहन केलं गेलं पाहिजे असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.