अवकाळी पावसाने मेघगर्जना आणि गारपीटेसह नेरीत केले आगमन

ग्रामीण प्रतिनिधी:रामचंद्र कामडी नेरी
चिमूर तालुक्यातील नेरी व परिसरातील गावांमध्ये दिनांक 23 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी चार ते पाच च्या दरम्यान वादळी पावसाने सुरुवात करून गारपीट वर्षाव झाल्याने परिसरातील जनतेची तारांबळ उडाली. गारपिटीने सह अचानक कोसळणार्या पावसामुळे नागरिकांची पुरती तारांबळ उडाली आहे. अवकाळी पावसाने अचानक एंट्री मारल्याने नेरी बाजारपेठेमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही मिनिटातच पावसाचा जोर वाढला आणि मांनसुंच्या पावसापेक्षा ही जोरदार सरी कोसळल्या आहे .काही भागात गारपीट देखील झालेली आहे. शेतकऱ्याचे उन्हाळी हंगामातील पिकांचे प्नुकसान झालेले आहे त्यात भाजीपाला, आंबा, मिरची ,लिंबू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. अचानक आलेल्या पावसामध्ये जिकडे तिकडे गारीचा सडा सडा पसरलेला होता. त्यामुळे नेरी बाजार पेठेतील भाजीपाला विक्रेत्यांना धावपळ सुरू करावी लागली होती.