ताज्या घडामोडी

गोंदेडा ग्रामस्थांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास सचिव असमर्थ म्हणून २ ऑक्टोंबर ची ग्रामसभा घेण्यास नकार

उपसंपादक :विशाल इन्दोरकर

दर वर्षी प्रमाणे २ ऑक्टोंबर ला ग्रामसभा घेण्यात येते. आणि कोरोना महामारीच्या या पाशर्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग तसेच नियमाचे पालन करून ग्रामसभा घेण्यास सी. ओ. नी मंजुरी दिली. परंतु गोंदेडा येथील सचिव ग्रामसभा घेण्यास तयार नाही. मागील काही दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी सी. ओ. व गट विकास अधिकारी कडे गोंदेडा गट ग्राम पंचायत मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध तक्रार केली असल्यामुळे गावातील नागरिक संताप व्यक्त करत आहे. ग्रामसभा मध्ये ग्रामस्थांचे कुठल्याही प्रश्नाची उत्तरे देण्यास असमर्थ असल्यामुळे सचिव ग्रामसभा घेण्यास विरोध दर्शवत आहे. ग्रामस्थ सरपंच तसेच उपसरपंच यांच्याकडे ग्रामसभा घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून त्यावर कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया ग्रामस्थांना दिली गेली नसल्याने गावातच सक्षम असलेली ग्रामसभा यांनी मा. गट विकास अधिकारी कडे लेखी तक्रार सादर केली आहे. त्यावर वरील अधिकारी सदर तक्रारीवर काय कार्यवाही करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close