महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीचा सन्मान करणारा समाज निर्माण करणे गरजेचे आहे -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
तालुका प्रतिनिधी : ग्यानीवंत गेडाम वरोरा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वच भारतीयांना समानता देणारी समान मानवी मूल्य देणारी लोकशाही आणि तिला देणारे संविधान निर्माण केले आहे या संविधानाला अभिप्रेत राजकारण सर्वसामान्य देशयाचे नायकपन देणारे राजकारण आहे पण हे राजकारण अस्तित्वात येण्यासाठी संविधानिकनिष्ठ राजकारण्यांच्या हातात सत्तेचे सर्व दोर येन्याची आणि भारताच्या अश्या लोकांच्या हातात हे सत्तेचे दोर देण्याची गरज आहे बाबासाहेबाना एक मत एक मूल्य एक व्यक्ती या नैतिक सूत्रांत बांधलेला समाज हवा होता म्हणून बाबासाहेबांनी म्हंटले होते की तुमच्या मताची किंमत ही मीठ मिरची इतकी समजू नका ज्यादिवशी या तुमच्या मताचे सामर्थ्य तुम्हाला समजेल त्यादिवशी तुमचे मत विकत घेऊ पाहणाऱ्या इतका कंगाल कोणी नसेल मग हे मत पाचशे हजार रुपयांना का विकता? हे सर्वांना पटवून देण्याची आज गरज आहे तरच या देशयाची लोकशाही जिवंत राहील त्यासाठी या लोकशाही चा सन्मान करणारा समाज निर्माण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी तिरखुरा येथे ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती बाबासाहेब युवा मंच आणि शिवप्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भीम जयंती महोत्सव निमित्त आपल्या प्रमुख मार्गदर्शनात बोलत होत्या या कार्यक्रमाचे अद्यक्ष नंदन लोखंडे प्रमुख मार्गदर्शक बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे राष्ट्रीय संघटक इंडियन अंलायन्स मोव्हमेंट आंबेडकरिस्ट बुद्धिस्ट सोसायटी नागपूर चे शुभम दाहट ऍडोकेट ज्योतिताई लोखंडे उपसरपंच विलास घारगे शिवप्रतिष्ठान च्या महिला अद्यक्ष माधुरी ताई वीर हे उपस्थित होते पुढे बोलताना समतादूत प्रज्ञा राजूरवाडे म्हणाल्या की सर्वसामान्य लोकांच्या भोळेपणाचा फायदा घेऊन या देशयात धर्माच्या नावाखाली राजकारण होताना दिसते आहे धर्म आपल्या घरात मनात ठेवून राजकीय सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी सेक्युलरीझम म्हणजे काय आहे आणि तोच देशयाच्या हिताचा कसे आहे तसेच येथील राजकीय अर्थव्यवस्था लोकांना पटवून द्यायला हवी राजकारणात फक्त केवळ मतदार म्हणून येणारे लोक निवडणे गरजेचे आहे ज्या व्यक्तीकडे धर्मनिरपेक्ष मतदार हा पासवर्ड असेल जातीविहिनतेचा पासवर्ड असेल तरच तुम्ही त्याच व्यक्तीला सत्तेच्या किल्या हस्तगत करू द्या बाबासाहेबांचे संविधान असल्या लोकांना सत्ताधारी करू इच्छित आहे यातच देशयाचे हित आहे बाबासाहेबांचा लिहलेला प्रत्येक शब्द हा समतेचा विश्वसंविधान निर्मित आहे या जगाला करुणेचा मैत्री चा संदेश देणारा आहे सर्वांना त्यानी दिलेली दिशा सूर्यासारखे एक पाऊल पुढे टाकून सत्ता पथ आर्थिक विकास सामाजिक विकास समतेचा बंधुता न्याय प्रस्थापित करण्यासाठी मार्गक्रम करन्यासाठी आहे यासाठी या देशयातील सर्व च समाजातील नागरिकांना सुंदर माणुसकीच्या लोकशाहीची प्रस्थापना समजून घेणे काळाची गरज हेच खरे महामानव ड्रा बाबासाहेब यांना अभिवादन ठरेल या कार्यक्रमाचे संचालन सेजल लोखंडे प्रास्तविक प्रचिता डांगे तर कार्यक्रमाचे आभार बालाजी वाघमारे यांनी मानले.