शहरवासीयांनी साथ दिल्यास विरोधकांना नगरपालिकेत पुन्हा शून्यावर बाद करतो – बाबाजानी दुर्राणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
मागील पस्तीस वर्षात नगरपालिकेच्या माध्यमातून पाथरी शहरातील सर्वधर्मसमभाव जपला.खेडेगाव सारखी परिस्थिती असलेल्या पाथरीचा मोठा विकास केला. यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली.विकास करत असताना जाती धर्माचा विचार केला नाही. तरीही माझा विरोधक म्हणतो की,आम्ही पाथरीसाठी काय केलं? माझ्यावर प्रेम करणारी जनता आज शेकडोच्या संख्येने येथे उपस्थित आहे.आम्ही लोकांची कामे केली नसती तर एवढ्या प्रमाणात लोक इथे आली असते का?

असे म्हणत येणाऱ्या पाथरी नगरपालिका निवडणुकीत जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा पैकीच्या पैकी आमचे उमेदवार निवडून आणतो आणि विरोधकांना पुन्हा शून्यावर बाद करतो अशी भीमगर्जना माजी आ.बाबाजानी दुर्राणी यांनी दर्गा मोहल्ला येथील पक्षप्रवेश कार्यक्रमानिमित्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन बबलू कुरेशी,मुस्तफा अन्सारी.हबीब कुरेशी,सगीर अन्सारी यांनी केले होते.

यावेळी बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अलीम कुरेशी,कोराख कुरेशी,मुकीद कुरेशी,शोएब कुरेशी,सत्तार कुरेशी,जावेद कुरेशी,इमरान खान,खैसर कुरेशी,शकी कुरेशी, शकील अन्सारी,अमजद खान, शेख फेरोज,सगीर अन्सारी इत्यादी सह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.यावेळी व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते.