ताज्या घडामोडी

इ- पीक पाहणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शेतकऱ्यांच्या बांधावर


राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे शेतकऱ्यांची इ- पीक पाहणीसाठी करत आहे धडपड.

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा:–शेतकऱ्यांच्या जमिनीवर लावलेल्या पिकाची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने स्मार्टफोनच्या आदराने शेतकऱ्यांनी करायचे आदेश दिले आहेत, शेतकरी आर्थिक विवंचनेत असताना ई पीक पाहणीचा डोकेदुखी शेतकऱ्यांच्या मागे लागली आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाही ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क नाही या समस्या लक्षात घेउन राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष अभिजित कुडे यांनी शेतकऱ्यांची ई पीक नोंदणी करायचे ठरविले आहे .
राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन स्वतः ई पीक नोंदणी करून देतं आहे . संपूर्ण विधानसभेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस ततर्फे ई पिक नोंदणी साठी सहकार्य करण्याचे आवाहन अभिजित कुडे यांनी केलं आहे. गावातून या ई पीक नोंदणी ला सुरूवात केली . न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे सचिव रोशन भोयर, विनोद कोठारे, विजय कुडे, राजेन्द्र कुडे, रंजीत कुडे, साहिल पानतावणे, प्रशांत कुडे, कुनाल गौलकर , ऋषिकेश पाटील , तुषार उरकुडे , सूरज हिवरकर, पंकज डोमकावडे , सचिन कुडे, अक्षय काटकर कार्यकर्त या साठी झटत आहेत .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close