ताज्या घडामोडी
राष्ट्रपिता म.जोतिराव फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर व प्रबोधन सभा संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
राष्ट्रपिता म. जोतिराव फुले व डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त लोक विकास केंद्र व संयुक्त जयंती समितीच्या वतीने ,आज दिनांक 17/4/2022 रोजी रक्तदान शिबीर व प्रबोधन सभा संपन्न झाली.यावेळी रक्तदान शिबीराचे उद्घाटन करतांना आमदार बाबाजानी दुर्रानी साहेब, रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डी. एस. नरसिंगे, अॅड.लासुरे, विशुध्दानंद वैराळ, डाॅ. कोल्हे, कोरोइंडियाचे मराठवाडा समन्वयक विलास मगरे , अरविंद हमदापुरकर, साक्षी गिरी ,सुनिता हिवाळे व इतर हजर होते.