ताज्या घडामोडी

केंद्र सरकारचा गोंडपिपरीत बाईक रॅली द्वारे निषेध

ग्रामीण प्रतिनिधी :महेश शेंडे विठ्ठलवाडा

केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात उत्तरप्रदेशातील लखीमपुर येथे चालू असलेल्या शांतप्रिय आंदोलनकर्त्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने गाडीने चिरडन्यात आले.देशाच्या इतिहासात लोकशाहीला काळिमा फासणारी घटना घडली.त्या निषेधार्थ दि.११ सोमवारी महाविकास आघाडीतर्फे गोंडपीपरित शिवाजी चौक ते तहसील कार्यालय बाईक रॅली काढून बंद ची हाक देत निषेध करण्यात आला.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार, काँग्रेस तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष नितेश मेश्राम काँग्रेस महिला तालुका अध्यक्षा रेखाताई रामटेके,बाजार समिती सभापती सुरेश चौधरी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुनील संकुलवार, शिवसेना तालुका प्रमुख नितीन धानोरकर, जेष्ठ कार्यक्रर्ते वासुदेव सातपुते, काँग्रेस अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष गौतम झाडे, काँग्रेस शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, काँग्रेस जिल्हा महासचिव कमलेश निमगडे ,उपसरपंच बालाजी चनकापुरे, सरपंच पोचमलु उलेंदला, शिवसेना शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,बब्बू पठाण, अशपाक कुरेशी ,रमेश नायडू, आनंदराव गोहणे, शिवसेना तालुका संघटक शैलेश बैस,गिरीधर दिवसे, प्रमोद दुर्गे, पुरुषोत्तम वाघ ,बबलू कुळमेथे ,वासुदेव नगारे ,राजीव सिंह चंदेल, शंभू येलेकर,विवेक राणा,आशीर्वाद पिपरे,तुकाराम सातपुते ,शुभम भोयर,भारत देवतळे यांच्यासह शेकडो महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close