उद्योगांच्या वाढीसाठी, समृद्धीसाठी व रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक विस्तार.यात मोठया प्रमाणात विदर्भाचा फायदा-मा.ना.श्री. नितीन गडकरी
खासदार औद्योगिक महोत्सव या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांची उपस्थिती.
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
औद्योगिक विस्तारासाठी आणि उद्योगांना भरभराटीसाठी रोजगार निर्मितीसाठी नागपुर व विदर्भ क्षेत्राचे प्राधान्य गुंतवणुकीचे ठिकाण म्हणून फायदेशीर आणि राष्ट्रीय स्तरावर प्रभावीपणे प्रयत्न.सरकार, औद्योगिक समुदायाला फायदेशीर ठरणारी धोरणे आणि सुधारणांचे समर्थन प्रदेशात नवीन गुंतवणूक आकर्षित करण्याच्या दिशेने कार्य,इंडस्ट्रियल एक्स्पो, विदर्भाच्या औद्योगिक विकासावर कॉन्क्लेव्ह, गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी अॅडव्हांटेज विदर्भ या विषयावर सेमिनार होईल यासाठी या खासदार औद्योगिक महोत्सवाचे आयोजन सेंट्रल पॉईंट हॉटेल नागपुर येथे करण्यात आले.
या खासदार औद्योगिक महोत्सवाला मा.ना.श्री. नितीन गडकरी यांनी मार्गदर्शन करतांना
औद्योगिकीकरणात वाढ झाल्यास यात विदर्भाचा मोठ्या प्रमाणात फायदा होईलच लाखो बेरोजगारांना काम मिळेल. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (एआयडी), नागपूर विविध उद्योग आणि उपक्रमांत सहभागी होऊन विदर्भात आपल्या उद्योगांच्या वाढीसाठी आणि समृद्धीसाठी आणि असंख्य रोजगार निर्मितीसाठी प्रचंड क्षमता आहे.खासदार औद्योगिक महोत्सवाच्या अंतर्गत अॅडव्हान्टेज विदर्भ ही विदर्भातील विविध क्षेत्रांमध्ये औद्योगिक विकासाला गती देण्याच्या एकमेव उद्देशाने एक पुढाकारात्मक संकल्पना आहे. ज्यामध्ये प्रत्येक भागधारक मॅटो, प्रत्येक हात महत्त्वाचा आहे प्रत्येकांचे स्वागत आहे.क्षेत्रातील उद्योगांनाविषयी महत्त्वपूर्ण विचार व्यक्त करत,उत्कृष्ट सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला खासदार अशोकजी नेते यांनी बोलतांना खासदार औद्योगिक महोत्सव हा अतिशय चांगला आणि दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला या माध्यमातून विदर्भाचा विकास होईलच त्यानिमित्ताने लाखो बेरोजगार युवकांना काम मिळेल.अशा या चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन झाले.मी मान. नितीनजी गडकरी साहेबांचे सर्व प्रथम मनापासून कौतुक व अभिनंदन करतो.
आपला गडचिरोली जिल्हा अतिदुर्गम नक्षलग्रस्त, आकांक्षित,अविकसित जिल्हा आहे.हया जिल्हात मोठया प्रमाणात खनिज संपत्ती आहे.यात हिरा,पन्ना, सोना,मैगनेट, कोळसा,लोहा,असे विविध खनिज संपत्ती ने विपुल प्रमाणात व्यापलेला आहे.
या जिल्ह्यात 1927 मध्ये जमशेदपूरचे टाटा या ठिकाणी येऊन पाहणी केली होती. पण इथे ट्रान्सपोर्टिंगं नाही, रेल्वे लाईन नाही, रस्त्यांची दुरअवस्थां असल्याने सुरजागढ ला मोठा कारखाना त्यावेळी होऊ शकला नाही.पण सुरजागड व कोनसरी ला आता प्रोजेक्ट ची सुरुवात झालेली आहे या खनिज संपत्ती च्या निमित्ताने सुद्धा गडचिरोली चा विकास होईलच.
मान. नितीनजी गडकरी साहेब यांच्या प्रयत्नाने साडे चौदा हजार करोड रुपये (14.500) केंद्राकडून रोड लाईनच्या विकास कामासाठी निधी खेचून आणला आहे. गडचिरोलीचा विकास होईलच पण विदर्भाचा सुद्धा विकास होईल असे प्रतिपादन या खासदार औद्योगिक महोत्सवाच्या कार्यक्रम प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी केले
यावेळी मंचावर प्रामुख्याने
मा.ना.श्री. नितीन जी गडकरी केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक व महामार्ग,खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोक नेते, खासदार कृपाल तुमाने,खासदार सुनिल मेंढे, अजयजी संचेती- माजी खासदार श्री सत्यनरंजी नवल-उद्योगपती, डॉ.अनिलजी बोंडे-राज्यसभा अमरावतीचे सदस्य डॉ. विजय शर्मा,श्री. अतुलजी गोयल श्री आशिष काळे, तसेच विदर्भातील आलेले उद्योजक उपस्थित होते.