दीक्षाभूमीच्या विकासासाठी घोषित 56 कोटी 90 लक्ष रुपयांच्या अंतिमटप्यातअसलेल्या निविदेला मंजूरी द्या – आ. किशोर जोरगेवारांनी अधिवेशनात केली मागणी
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चंद्रपूर दिक्षाभुमीच्या विकासासाठी 56 कोटी 90 लक्ष रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. हा प्रस्ताव शेवटच्या टप्यात असुन असुन तात्काळ सदर कामालाच्या निविदेला मंजुर प्रदान करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना केली आहे.
चंद्रपूर येथील पवित्र दिक्षाभुमीच्या विकासासाठी आमदार जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. सदर विकासकामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. दरम्यान या कामासाठी 56 कोटी 90 लक्ष रुपयांचा निधीची घोषणा करण्यात आली असुन सदर प्रस्ताव अंतिम टप्यात आहे. मात्र आमची मागणी 100 कोटी रुपयांची होती. यातील केवळ 57 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित निधीही मंजूर करण्यात यावा अशी मागणी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले कि, नागपूर नंतर केवळ चंद्रपूरात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिली. नागपूर येथील दिक्षाभुमीचा विकास झाला. मात्र चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. त्यामुळे सदर दिक्षाभुमीचा विकास करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावे असेही ते यावेळी म्हणाले.
चंद्रपूर सह सर्व विज उत्पादक जिल्हांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी ही मागणी पुन्हा एकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना आमदार जोरगेवार यांनी केली. यावर बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, जगातील सर्वात प्रदूषित असलेली थर्मल एॅनर्जी आम्ही निर्माण करतो. परिणामी प्रदुषण वाढत आहे. चंद्रपूर जिल्हाचा विचार केल्यास 2023 मध्ये 30 दिवसांपैकी 30 दिवस प्रदूषित होते. त्यामुळे श्वसनाचे, हृदयाचे आजार निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेता प्रदूषण नियत्रंण स्मॉग टावर उभारण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. सोबच उपमुख्यमंत्री यांनी सोलर एनर्जी च्या माध्यमातुन 300 युनिट मोफत देण्याची घोषणा केली आहे. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार आहे. त्यामुळे सर्व विज उत्पादक जिल्हांना 200 युनिट विज मोफत द्यावी अशी मागणी त्यांनी पून्हा एकदा अधिवेशनात केली आहे. सुरजागड येथे सर्वोतम दर्जाचे लोहखनिज मिळाले आहे. त्यामुळे लोहखनिजवर आधारीत उद्योग चंद्रपूरात सुरु करण्यात यावे असेही यावेळी ते म्हणाले.