नेरी ग्राम पंचायतचा मनमानी कारभार
ग्रा. प. सदस्य पिंटू खाटीक व संगीता कामडी आणि इतर आठ सदस्यांचा आरोप
उपसंपादक :विशाल इन्दोरकर
नेरी ग्रामपंचायत चा मनमानी कारभार सुरू असून सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे इतर सदस्य याना विचारीत नसून त्यांना विश्वासात न घेता अंगणवाडी बांधकाम च्या कामाला सुरुवात केले आहे सदर अंगणवाडी बांधकाम बाबत चे नियोजन सुद्धा नियमाप्रमाणे न करता आपल्याच मर्जीने सुरू केले आहे असा आरोप ग्रा. प. सदस्य पिंटू खाटीक संगिता कामडी आणि इतर आठ सदस्य नी केला आहे.
या कामाबाबत सविस्तर असेंकी की अंगणवाडी चे बांधकाम हे मार्च महिन्यानंतर करावयाचे होते तसे नियोजन झाले होते सदर कामाचे 13 मार्चला भूमिपूजन झाले होते मात्र शासनाच्या नियम बाह्य पद्धतीने अंगणवाडी च्या कामाला सुरुवात झाली होती तेव्हा पिंटू खाटीक आणि इतर सदस्य यांनी काम थांबवण्यासाठी गटविकास अधिकारी यांना तक्रार देऊन चौकशी ची मागणी केली होती तेव्हा 13मार्च ला गट विकास अधिकारी यांनी काम तात्काळ थांबवण्यात यावे असे पत्र सचिव व सरपंच याना दिले होते नाहीतर होणाऱ्या कारवाईस स्वत जवाबदार राहाल असा इशारा दिला होता. त्यामुळे या अंगणवाडी चे काम थांबवण्यात आले होते या कामाची चौकशी करण्यासाठी 16 मार्चला या क्षेत्राचे विस्तार अधिकारी गुंतीवर साहेब आले आणि चौकशी करून सर्व सदस्य ना बोलावून सांगितले की अंगणवाडी चे कामाला वेळ असून सदर काम हे मार्च नंतर सुरू करण्यात यावे असे सहमती पत्र देऊन गेले परंतु त्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली असून सदर कामाला आज दि 27 मार्चला सुरवात झाली असून ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांचा मनमानी कारभार दिसून येत आहे. असा आरोप ग्रा. प. सदस्य पिंटू खाटीक संगीता कामडी आणि इतर 8सदस्य यांनी केला आहे.
सदर काम हे शासन निमप्रमाणे नसून शासनाच्या अटी व शर्तीचे अधीन नसून नियम बाह्य आहे तरी संबंधित विभागा ने या बाबीची सखोल चौकशी करून काम तात्काळ थांबवावे तसेच या कामासाठी खोदलेले खडे बुजवण्यात यावे जेणे करून लहान मुले आणि जनावरे यांची जीवित हानी होणार नाही आणि प्राणहानी होणार नाही या कामाची पूर्ण चौकशी करून कामाला सुरुवात करावी अशी मागणी पिंटू खाटीक संगीता कामडी आणि इतर सदस्य नी केली आहे.