ताज्या घडामोडी

जामगाव (खुर्द) येथे कृषी दिन साजरा

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय मूल मारोडा येथे शिक्षण घेत असलेल्या सातव्या सत्रातील विद्यार्थी कृषी संशोधन केंद्र एकार्जूना यांच्या मार्गदर्शनाखाली जामगाव खुर्द येथे कृषी दिन साजरा केले. प्रथमता स्वर्गीय कै. मा. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात लाभलेल्या अध्यक्ष ग्रामपंचायत जामगाव खुर्द येथील सरपंच .माधुरी घागी, उपसरपंच राज्यपाल पाचभाई , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जांभुळे सर ,डॉ.खिरटकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रणय पवार यांनी प्रस्तावना करून विविध योजनेची शेतकऱ्यांना माहीती दिली. कृषी विषयक शेतीचे नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. पशुवैद्यकीय अधिकारी जांभुळे सर यांनी विविध शासकीय पशु संगोपन योजनेची माहिती दिली. गावातील तरुण शेतकरी आपले मनोगत व्यक्त केले व विविध योजना च्या विषयी माहिती विचारली. त्यानंतर माननीय सरपंच माधुरी घागी यांनी कृषी दिनाविषयी आपले शब्द मांडले. त्याचबरोबर गावातील सरपंच व ग्रामस्थ यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला .आणि गावातील गुरांचे लसीकरण याविषयी माहिती पशुवैद्यकीय अधिकारी जांभळे सर यांनी दिले .गावातील शेतकऱ्यांना गुरांच्या लसीकरणासाठी प्रोत्साहित केले व सर्व गावकऱ्यांनी आपल्या पशूचे लसीकरण करून घेतले या लसीकरण मोहिमेत 121 बैल ,25 गाय, 80 शेळ्याचे लसीकरण करण्यातआले.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी हेमंत सिडाम , अनिकेत मडावी ,सुरज बरमदे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. व कुणाल कु-हटकर याने आभार प्रदर्शन केले आणि शेतकऱ्यांना वृक्ष भेट देऊन सत्कार केले.
या कार्यक्रमास कृषी महाविद्यालय मूल मारोडा चे सहयोगी अधिष्ठता विष्णुकांत टेकाळे सर व डाॅ. दिनेश नवलकर सर , डॉ. शैलेश सरनाईक सर डॉ. विलास साखरकर सर, तसेच कृषि साशोधन केंद्र ,एकर्जूना चे डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार सर यांचे मार्गदर्शन लाभले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close