ताज्या घडामोडी

आपले सर्वच्या सर्व उमेदवार बहुमताने विजयी करण्याचा निर्धार! : -आ. बाबाजानी दुर्राणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली असून येत्या 30 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक व प्रमुख पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते. अनेकांनी यावेळी मार्गदर्शन करत भूमिका मांडली. पाथरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पकड मजबूत असून 75 टक्के पेक्षा अधिक सोसायटी व ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आहेत. त्यामुळे यावेळेस ही आपला विजय निश्चित आहे.
मागील काळात आपण दिलेला शब्द पूर्ण करत मार्केट कमिटीची सुसज्ज इमारत उभारली, छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला, मोठ्या प्रमाणावर गाळे उभारले. यासह शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. बाजार समितीचे गाळे, बैल बाजार, आठवडी बाजार आपण मोठा केला. त्यातून उत्पन्न वाढत आहे.
मार्केट कमिटीचे वैभव वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले प्रयत्न राहिले आहेत व येणाऱ्या काळात सुद्धा त्यात कुठेही खंड पडू देणार नाही. सर्वानुमते योग्य व सक्षम असे उमेदवार आपण ठरवणार आहोत. या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. सर्वांनी एकदिलाने आपल्या पॅनलचा पूर्ण बहुमताने विजयी करण्याचा निर्धार केला!
या वेळी माजी सभापती अनिलराव नखाते यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचा आढावा सांगितला, या कार्यक्रमास गंगाधरराव गायकवाड, मुंजाजी भाले पाटील,सुभाषराव कोल्हे,दादासाहेब टेंगसे,दत्तराव मायंदलळे,एकनाथराव शिंदे,माधवराव जोगदंड,कुंडलीकराव सोगे,रंगराव आढाव, चक्रधरराव उगले,तुकारामजी जोगदंड, विजय पाटील सिताफळे,अण्णासाहेब रनेर,नारायणराव आढाव,राजेश ढगे,सदाशिव थोरात,रमेश तांगडे,संजय रनेर,रामप्रसाद कोल्हे व इतर मान्यवर उपस्थित होते.
==============================प

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close