ताज्या घडामोडी

महिला सक्षमीकरण काळाची गरज- डॉ काकाणी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव जागतिक महिला दिनानिमित्त येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आयोजित कार्यक्रम प्रसंगी डॉ काकाणी बोलत होत्या, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, कौटुंबिक स्वास्थ्य व हित हे महिलांच्या हातात आहे, आज शिक्षणामुळे महिलांची सर्वांगीण प्रगती झाली असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी महिला बजावत आहेत, त्यांना संधी उपलब्ध करून त्यांचे सक्षमीकरण करने काळाची गरज आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करुन झाले. यावेळी डॉ सौ मोदानी, अॅड आरती कांडुरे उपस्थित होत्या. यानंतर गर्भसंस्कार व पालकत्व तसेच महिलांचे विविध आजार व आयुर्वेदिक उपचार याविषयी सविस्तर माहिती डॉ मोदानी यांनी दिली. तसेच अॅड आरती कांडुरे यांनी महिला संरक्षण कायदे व शिक्षेची तरतुद याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशाल देवकते, आभार शिवशंकर भंडारे तर सुत्रसंचालन सौ प्रिया मालानी यांनी केले. यावेळी बालसंस्कार प्रतिनिधी, महिला पुरुष सेवेकरी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close