ताज्या घडामोडी
वरोऱ्यात युवासेनेचे महागाई विरुद्ध थाली बजाओ आंदोलन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे तथा युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या आदेशानुसार युवासेनेने वरोरा येथे रविवार दिनांक 3 एप्रिल रोजी रोजी वाढत्या महागाई मुळे केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करीत थाली बजाओ आंदोलन केले.
युवा सेनेचे चंद्रपूर जिल्हा चिटणीस मनीष जेठाणी , युवासेना उप जिल्हा अधिकारी आलेख रठ्ठे यांच्या नेतृत्वात सदर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात
शिवसेना शहर प्रमुख संदीप मेश्राम, नगरसेवक दिनेश यादव,उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण ठेंगणे,सागर पिंपळशेंडे,निहाल धोटे,मनीष दोहतरे,अनिल गाडगे,राहुल दारुंडे ,अमोल देऊळकर,प्रमोद हेपट,राहुल भालेराव,सूरज मेश्राम,आशिष मित्तपल्लीवर, गौशा गोबाडे,कैलास मोहारे,सोहेल शेख,हर्षल मडावी उपस्थित होते.