मजरा (लहान )येथे राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड द्वारा एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर संपन्न
तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
वरोरा तालुक्यातील सालोरी येन्सा ब्लॅक मजरा लहान येथील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहातआज दिनांक 13 -10- 2022 ला दंतोपंत ठेंगळी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड, प्रादेशिक संचालनालय, नागपूर द्वारा एक दिवसीय अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन माजी विधान परिषदेचे सभापती एड्. मोरेश्वर टेंमुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने मंचावर शिक्षणाधिकारी प्रमोद रत्नपारखी,राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष साठे ताई, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरोरा तालुका अध्यक्ष सुशीला तेलमोरे, सालोरी येंन्सा ब्लॅक ग्रामसेवक एकनाथ चाफले, पत्रकार ग्यानीवंत गेडाम, तंटामुक्त समिती अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य सारिका धाबेकर,ग्रामपंचायत सदस्य हर्षद निब्रड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती एडवोकेट मोरेश्वर टेमुर्डे उपस्थित प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना ते म्हणाले की, आजचा काळ डिजिटल काळ आहे त्यामुळे डिजिटल साक्षर होणे काळाची गरज आहे.
प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना शिक्षणाधिकारी प्रमोद रत्नपारखी यांनी कार्यक्रमाचे महत्त्व विशद करताना कौशल्य विकासाची कास धरून आपण उत्कर्ष साधावा. यासाठी शासनाच्या कल्याणकारी योजना च महिलांना सक्षम बनविण्यास मदत करतात. कार्यक्रमात वेगवेगळे विषयाची माहिती देऊन महिला प्रशिक्षणार्थींना जागृत करण्यात आले. कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी सुद्धा आपले विचार मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ग्रामीण स्वयंसेविका श्रीमती सुशीला तेल मोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य व तंटामुक्त समिती अध्यक्ष सारिका धाबेकर, माधुरी पिंगे, कुंता प्रदीप मोजे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला शेकडो महिलांनी लक्षणीय सहभाग दर्शविला होता हे विशेष.