महादवाडी गावात अवैध दारूविक्री विरोधात सरपंचाचे शासनाला निवेदन
ग्रामीण प्रतिनिधी : वृषभ कामडी मोटेगाव
चिमुर तालुक्याच्या टोकावर असलेल्या महादवाडी गावामध्ये सर्रास अवैध दारूविक्रीला उधाण आले आहे. अवैध दारुविक्रेत्यांनी गावात धुमाकूळ घातलेला आहे. अशातच एका महिलेने टेन्शन मुळे दारू पिऊन धिंगाणा घातला. हे असे प्रकार गावच्या सुविकासासाठी प्रयत्नशील असणारे महादवाडी चे सरपंच श्री भोजराज कामडी यांना पहावले नाही. म्हणून त्यांनी त्याविरोधात आवाज उठविला असता, दारू विक्रेत्यांकडूनच त्यांना व ग्रा. पं. च्या इतर सदस्यांना धोका निर्माण झालेला आहे.
या दारू विक्रीचा गावच्या विकासावर व समाजमनावर होणाऱ्या विपरीत परिणामाला आळा घालण्यासाठी सरपंचांनी दारूबंदी साठी शासनाकडे मदतीची याचना केली आहे. गावचे विकास, आरोग्य व समाज ठिक राहावा, त्याकरिता पोलिसांमार्फत ह्या दाविक्रेत्यांवर कारवाही करून गावात दारूबंदी करण्यात यावी. यासाठी सरपंच यांनी जिल्हा अधिकारी चंद्रपूर, मुख्यमंत्री ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री पवार साहेब, पालकमंत्री वडेट्टीवार साहेब, आमदार बंटीभाऊ भंगडीया तसेच जि. प. गटनेते वारजूरकर यांना यासमबंधी ग्राम पंचायत मार्फत २१ सप्टेंबर २०२१ रोजी पत्र दिलेले आहे.