ताज्या घडामोडी
नवेगाव ( रामदेगी ) येथील स्मशानभूमीला जाण्याकरिता रोड व पुलाची आकाश श्रीरामे तथा गावकऱ्यांची मागणी

मुख्य संपादक :कु. समिधा भैसारे
चिमुर तालुक्यातील नवेगाव – रामदेगी येथील स्मशानभूमीला जाण्याकरिता रोड व रोडावरच नाला असल्याने पावसाळ्यात प्रेत नेण्यासाठी गावकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे खडसंगी वरून १ किलोमीटर अंतरावर नवेगाव रामदेगी पुनर्वसनातील गाव असुन स्मशानभूमीला जाणाऱ्या रोडवर पाण्याचे पाट असल्याने त्यां ठिकाणी पुल बांधकाम करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आकाश श्रीरामे तथा गावकरी पतीराम नेहारे तंटामुक्त समिती सदस्य,प्रकाश चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य,चंदु भोयर माजी ग्रामपंचायत सदस्य,कीशोर चौधरी, विलास गराटे, गंगाधर मेश्राम,रतीराम गायकवाड, आशिष चौधरी, हरीभाऊ भोयर, संदीप गायकवाड, हरीभाऊ धारणे, नंदकीशोर चौधरी,गणेश दडमल आदी समस्त नवेगाव ( रामदेगी) ग्रामस्थ यांनी मागणी केली .