ताज्या घडामोडी

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ‘हे’ करा

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

“भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पादनाचा नाही, तर वितरण व्यवस्थेचा मुख्य प्रश्न आहे. कोरोनाच्या काळात वितरण व्यवस्थेतील त्रुटी आपण पाहिल्या आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला प्रगतिपथावर न्यायचे असेल, तर शिक्षण, गुंतवणूक या क्षेत्राखालोखाल आपल्याला वितरण व्यवस्था सक्षम करण्यावर भर द्यावा लागेल,” असे प्रतिपादन अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटी फॉर मेम्बर्स इन इंडस्ट्री अँड बिझनेस (सीएमआयबी) आणि पुणे ‘आयसीएआय’ यांच्या वतीने आयोजित
सीएफओ-सीईओ’ संवाद सत्रात टिळक बोलत होते. या वेळी ‘आयसीएआय’ केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, सीएमआयबी’चे चेअरमन सीए हंस राज चुग, सीए दुर्गेश काबरा, विभागीय समिती सदस्य सीए यशवंत कासार, पुणे ‘आयसीएआय’चे अध्यक्ष व खजिनदार समीर लड्डा, माजी अध्यक्ष सीए अभिषेक धामणे, सीए ऋता चितळे आदी उपस्थित होते.
टिळक म्हणाले की, भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा तुलनेने फारसा परिणाम झालेला नाही. भारताची लोकसंख्या आणि भौगोलिक आकार यामुळे सेवा व उत्पादन क्षेत्रात मोठी उपलब्धी आहे. याचा वापर जागतिक बाजारपेठेत झाला, त्याचीनिर्यात वाढवली, तर भारताला त्याचा फायदा होईल. कोरोनामुळे ‘वर्क फ्रॉम होम’ संकल्पना रुजली आहे. अर्थव्यवस्थेत बदल आणणारा हा घटक आहे. गेल्या काही महिन्यांत वेतनातील अनिश्चिततेमुळे गुंतवणुकीकडे त्यातही विशेषत: शेअर बाजाराकडे अनेक लोक वळले आहेत. दीड वर्षात एक कोटीपेक्षा जास्त डीमॅट खाते उघडले गेले असून, व्यवहारही होत आहेत. येणाऱ्या काळात आर्थिक, कामगार, शैक्षणिक धोरणे आखताना या घटकांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यात सनदी लेखापालांनी महत्वाची भूमिका बजावावी. सीए अभिषेक धामणे यांनी स्वागत प्रास्ताविक केले. सायली चंदेलिया यांनी सूत्रसंचालन केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close