सोनपेठ येथे जागतिक वसुंधरा दिना निमित्त वृक्षरोपण
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
सोनपेठ येथे दिनांक २३ जुलै २०२२ वार शनिवार रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्व विद्यालय शाखा सोनपेठ व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन विकास संस्था मानवता विकास संस्था तसेच कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग सोनपेठ च्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवीवर्ष ,जागतिक वसुंधरा दिनाचे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून भव्य वृक्षारोपणचा कार्यक्रम करण्यात आला .
जागतिक तापमान वाढ होत असताना समृद्ध वसुंधरा करण्यासाठी आपण आजच जागे झाले पाहिजे तरच येणाऱ्या काळात आपण सुखी राहुत.
नगर परिषद मुख्याधिकारी विठ्ठल केदारे सर यांच्या सहकार्याने कडुलिंब, पिंपळ, वड, करंज, इत्यादी वृक्षची रोपे देण्यात आली.ही रोपे कै. रमेश वरपूडकर महाविद्यालय व राजाभाऊ कदम इंग्लिश स्कूल च्या परिसरात ही लावण्यात आली. याप्रसंगी उपस्थित मान्यवर ब्रह्मकुमारी मीरा दीदी देविदास वाडकर( प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा सोनपेठ संचालिका तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्था तालुका महिला अध्यक्ष,) डॉ. कस्पटे सचिन , संचालिका ज्योतीताई कदम, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते , डॉ. बापूराव आंधळे रा. से.यो. अधिकारी, प्रा. अंगद फाजगे प्रा. मुक्ता सोमवंशी, क्रीडा संचालक गोविंद वाकणकर, प्रा. बालासाहेब काळे, प्रा.मुकुंराज पाटील, प्राचार्य के .राहुल ,न.प.कर्मचारी धम्मपाल वाघमारे, प्रा. सुनिता टेनसे, प्रा. वनिता कुलकर्णी, स्वामी सर आदी उपस्थित होते.