ताज्या घडामोडी

दोन वेगवेगळ्या ठिकाणी हातभट्टी मोह दारू वर चिमूर पोलिसांची धाड

4 लाख 74 हजार 600रुपयांचा मुद्देमाल जप्त 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात आज 27 एप्रिल ला पेट्रोलींग करत असताना मुखबीराकडुन खाञीशीर माहिती मिळाली असता सुभाष वाघमारे व आशीष शंभरकर दोन्ही रा. कवडशी हे मानुसमारी जंगल परिसरात हातभट्टी मोहादारु काढत आहे. अशी गुप्त माहीती पोलीसांना मिळाली त्या वरुन मानुसमारी जंगल परिसरात पोलीस लपत छपत मोहादारु भट्टी कडे गेले असता दोन्ही आरोपी हे पोलीसांची चाहुल लागताच जंगलाचे दिशेने पळुण गेले. तिथे एकूण 2,50,600 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. तसेच सोनेगाव शिवार उमा नदीचे काठावर दारूबंदी धाड टाकली असता एकुण 224000 रु मुद्देमाल मिळुन आला. यातील आरोपी सुभाष वाघमारे व आशीष शंभरकर सर्व रा. कवडशी हे आहेत. आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकून मोह सडवा, हातभट्टी मोहा दारू असा एकूण 4,74,600 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून 4 आरोपी विरुद्ध रितसर दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हेची नोंद करण्यात आली आहे. पुढील कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. साळवे सा.मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बगाटे सा.पो.नि श्री रवींद्र शिंदे यांचे मार्गदर्शनात Api मंगेश मोहाळ NPC कैलास आलाम, अंमलदार HC विलास निमगडे, PC सचिन गजभिये, सचिन खामनकर, शैलेश मडावी,तसेच चालक HC शंकर उरकुडे, प्रमोद गुट्टे, प्रविण गोन्नाडे, यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close