ताज्या घडामोडी
अतिक्रमणधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन घरकुल योजनेचा लाभ द्या भारतीय क्रांतीकारी संघटनेची मागणी

अतिक्रमणधारकांना मालकी हक्काची पट्टे देण्याची कार्यवाही करून घरापासून वंचित असलेले बेघर वासियानां घरकुल योजनेचा लाभ द्या भारतीय क्रांतीकारी संघटनेची मागणी
तालुका प्रतिनिधी:कल्यानी मुनघाटे नागभीड
भारतीय क्रांतिकारी संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा याचें नेतृत्वात नागभिड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यानां निवेदनाद्वारे बोथली, बामणी, तुकुम, शिवनगर, बामणी मधील अबादी तसेच अतिक्रमणधारकांना मालकी हक्काची पट्टे देण्याची कार्यवाही करून घरापासून वंचित असलेले बेघर वासियानां घरकुल योजनेचा लाभ द्या अशी मागणी करण्यात आली. अन्यथा भारतीय क्रांतीकारी संघटनेकडून उग्र आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा यावेळेस देण्यात आला यावेळी नागभिड शहार प्रमुख आशाबाई सोनटक्के व इतर महिला उपस्थीत होते.